विश्वचषक ट्रॉफीसह सूर्याचा क्रेझी अंदाज! मध्यरात्री थेट ‘या’ ठिकाणी पायीच पोहोचला; पाहा व्हायरल व्हिडिओ

On: March 9, 2026 12:36 PM
Team India (1)
---Advertisement---

Team India | भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या विजयामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव थेट विश्वचषक ट्रॉफीसह मंदिरात दर्शनासाठी गेल्याचा एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडवर मोठा विजय, भारताचा ऐतिहासिक पराक्रम :

रविवार, 8 मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड (New Zealand) संघाचा पराभव करून आयसीसी टी-२० विश्वचषक (ICC T20 World Cup 2026) आपल्या नावावर केला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत मोठा धावसंख्येचा डोंगर उभारला. त्यानंतर गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना टिकू दिले नाही. अखेरीस भारताने हा सामना तब्बल 96 धावांनी जिंकत ट्रॉफीवर कब्जा केला.

या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने दमदार खेळ दाखवला होता. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या नेतृत्वाखाली संघाने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली. विशेष म्हणजे कर्णधार म्हणून पहिल्याच प्रयत्नात त्यांनी संघाला विश्वचषक जिंकून दिला. यामुळे भारतासाठी टी-२० विश्वचषक जिंकणारा सूर्यकुमार यादव हा पाचवा कर्णधार ठरला. या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात चाहत्यांनी रात्री उशिरापर्यंत आनंदोत्सव साजरा केला.

Team India | ट्रॉफीसह मध्यरात्री हनुमान मंदिरात दर्शन :

अहमदाबाद (Ahmedabad) येथील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) मैदानावर भारताने विजय मिळवल्यानंतर काही वेळातच एक वेगळे दृश्य पाहायला मिळाले. कर्णधार सूर्यकुमार यादव, संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह (Jay Shah) हे तिघेही विश्वचषक ट्रॉफी घेऊन पायी हनुमान मंदिरात पोहोचले. स्टेडियमच्या अगदी जवळ असलेल्या या मंदिरात त्यांनी जाऊन दर्शन घेतले आणि संघाच्या विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव, गौतम गंभीर आणि जय शाह मंदिराकडे चालत जाताना दिसत आहेत. त्यांच्या सभोवती चाहत्यांची मोठी गर्दी झाली असून अनेकजण फोटो आणि व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण असून या खास क्षणाचा व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.

News Title: Suryakumar Visits Temple With Trophy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now