थलपती विजयनंतर साऊथचा ‘हा’ सर्वात मोठा सुपरस्टार राजकारणात एंट्री करणार?

On: June 30, 2026 1:49 PM
Suriya Political Entry
---Advertisement---

Suriya Political Entry | तमिळनाडू (Tamil Nadu) मधील राजकारणात अभिनेता आणि मुख्यमंत्री थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या प्रवेशानंतर आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याच्या राजकीय वाटचालीबाबत चर्चा रंगू लागली आहे. अभिनेता सूर्या (Suriya) लवकरच राजकारणात उतरणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या. मात्र या चर्चांवर आता त्याच्या अधिकृत फॅन क्लबकडून सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

फॅन क्लबच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण :

थलपती विजय यांच्या राजकीय प्रवासानंतर तमिळ चित्रपटसृष्टीतील आणखी एखादा मोठा चेहरा राजकारणात येईल का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अशातच एका फॅन क्लब सदस्याच्या वक्तव्यामुळे अभिनेता सूर्या राजकीय क्षेत्रात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर या चर्चेने वेग घेतल्यानंतर अनेकांनी त्याच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली.

सूर्या अनेक वर्षांपासून ‘अगारम फाऊंडेशन’ (Agaram Foundation) या संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करत आहे. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे जर सूर्या सार्वजनिक जीवनात सक्रिय झाला, तर तो समाजासाठी अधिक मोठं योगदान देऊ शकेल आणि विशेषतः तरुण मतदार त्याच्या पाठीशी उभे राहतील, अशी भावना त्याच्या चाहत्यांकडून अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे. अलीकडे ‘ऑल इंडिया सूर्या वेलफेअर असोसिएशन’ (All India Suriya Welfare Association) च्या राज्य व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या आर. वीरमणी (R. Veeramani) यांनी सूर्या लोकनेता होण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही, असे विधान केले होते. त्यानंतरच या चर्चांना अधिक बळ मिळाले.

Suriya Political Entry | अधिकृत फॅन क्लबने अफवा फेटाळल्या :

वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे स्पष्ट करत आर. वीरमणी यांनी व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, बैठकीत व्यक्त केलेले विचार पूर्णपणे वैयक्तिक होते आणि त्याचा सूर्या किंवा सूर्या वेलफेअर असोसिएशनशी कोणताही संबंध नाही. त्यांच्या भाषणातील केवळ काही भाग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गैरसमज निर्माण झाला असून, त्यासाठी अभिनेता किंवा संघटनेला जबाबदार धरता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर सूर्याच्या अधिकृत फॅन क्लबनेही निवेदन प्रसिद्ध करून या अफवांवर पूर्णविराम दिला. आर. वीरमणी हे मागील तीन वर्षांपासून संघटनेच्या प्रशासकीय टीमचा भाग नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले.

News Title: Suriya Political Entry Rumours Clarified

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now