काल शपथ घेतली, आज खासदार म्हणतोय ‘मला मंत्री व्हायचं नाही’

Suresh Gopi | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी हे तब्बल तीन वेळा पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्यासह इतर खासदारांनी शपथ घेतली. मात्र एका खासदाराने शपथ घेऊन खातेवाटपाआधीच मला मोकळं करा, असं आवाहन सरकारला केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून गोपी सुरेश (Suresh Gopi) यांची मंत्रीपदावर वर्णी लागली आहे. त्यानंतर आता काल शपथविधी देखील झाला. मात्र गोपी सुरेश (Suresh Gopi) यांना राजीनामा द्यायचा आहे. केंद्रीय नेतृत्वाकडे त्यांनी याबाबत इच्छाही व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी शपथ घेतल्यानंतर आता मंत्रीपद नको असल्याचं सांगितलं आहे.

“मला कॅबिनेट मंत्रीपद नकोय”

माध्यमांसोबत बोलत असताना सुरेश (Suresh Gopi) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की मला आशा आहे की मला केंद्रीय मंत्रीमंडळातून मुक्त केलं जाईल. केंद्रीय नेतृत्वाला हा निर्णय घेऊ दे. खासदार म्हणून त्रिशूरमध्ये मी माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करेल. मला कॅबिनेट मंत्रीपद नकोय, असं सुरेश गोपी (Suresh Gopi) म्हणाले आहेत.

सुरेश हे त्रिशूरमधून भाजपचे एकमेव निवडून आलेले खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. एक्शन हिरो असलेल्या गोपी यांनी भाजपच्या तिकिटावर त्रिशूरमध्ये मोठा विजय मिळवत केरळमध्ये भाजपसाठी इतिहास घडवला असल्याचं दिसून आलं. केरळमध्ये अनेक दशकांपासून भाजप एकतरी उमेदवार निवडून येईल यासाठी झटत आहे. शेवटी सुरेश यांनी केरळमधून खासदार म्हणून विजय मिळवला.

सुरेश यांनी केरळमधून विजय तर मिळवलाच. मात्र तरीही त्यांच्या राजकीय कारकिर्दीत चढउतार पाहायला मिळत आहे. सुरूवातीला त्यांनी मंत्रीपद मिळवण्यासाठी नकार दिला होता. रविवारी त्यांना नरेंद्र मोदी यांचा फोन आला आणि ते ताबडतोब दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती समोर आली.

देवेंद्र फडणवीसांनंतर सुरेश यांनी म्हटलं ‘मला मोकळं करा’

सुरेश यांनी मला मोकोळ करा असं का म्हटलं आहे. आता त्याचं कारण समोर आलं आहे. ते म्हणाले की, मला माझे अर्धवट उरलेले चित्रपट पूर्ण करायचे होते. त्यासाठी मला मंत्रीमंडळातून मोकळं करा, असं आवाहन सुरेश यांनी केलं आहे. दरम्यान याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील राज्यात महाविकास आघाडीचा झालेला विजय जिव्हारी लागला आहे. त्यामुळे मला पदावरून मोकळं करा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली आहे.

News Title – Suresh Gopi Want Left Minister Post After Still NDA Government

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी पंतप्रधानपदाचा स्विकार करताच शेतकऱ्यांसाठी उचललं मोठं पाऊल!

मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला थेट इशारा!

पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्याचा विचार करताय? मग ‘या’ गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या

बुलेट लव्हर्ससाठी खुशखबर; रॉयल एनफिल्डच्या या बाईक लवकरच लाँच होणार

राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन; शरद पवार सरप्राईज देणार?