वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना ‘या’ जिल्ह्यात हलवा; भाजप आमदाराने केली मागणी

On: January 3, 2025 2:50 PM
Walmik Karad
---Advertisement---

Walmik Karad l गेल्या काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. मात्र या हत्या प्रकरणानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. कारण या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड कनेक्शन असल्याचं दिसून येत आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड हा निकटवर्तीय आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तसेच 31 डिसेंबर 2024 ला वाल्मिक कराड हा सीआयडी कार्यलयात शरण आला आहे. अशातच आता वाल्मिक कराड संदर्भात भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठी मागणी केली आहे.

भाजप आमदाराने केली मोठी मागणी :

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू आहे. कारण आता CID आणि SIT हे दोन्ही पथके बीडमध्ये तळ ठोकून आहेत. तसेच या हत्या प्रकरणातील आरोपी व वाल्मिक कराड हे सध्या बीड शहर पोलिस स्थानकात आहे. मात्र या लॉकअपमध्ये वाल्मिक कराडला सोयी सुविधा, बाहेरच्या लोकांना भेटायला मुभा असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी केल्यानंतर चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

दरम्यान, नुकतीच वाल्मिक कराडची भेट एका सरंपचाने देखील घेतली आहे. त्यामुळे आता भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना बीडमध्ये न ठेवता छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिकला हलवा अशी मागणी केली आहे. कारण भविष्यात ही केस देखील दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्याची वेळ येईल, असे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.

Walmik Karad l … तर आरोपींना ‘या’ जिल्ह्यात हलवा : सुरेश धस

आमदार सुरेश धस म्हणाले की, “बीडमध्ये हे प्रकरण चालवावे. परंतु बीडच्या लॉकअपमध्ये आरोपींना ठेवू नये. मात्र त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या किंवा नाशिकच्या जेलमध्ये हलवण्यात यावे. कारण या आरोपींना भेटायला आणि सुविधा द्यायला इथं अनेकजण आहेत” असं धस म्हणाले आहेत.

याशिवाय पुढे सुरेश धस म्हणाले, “मी आधीपण सांगितले आहे की, बीडमध्ये बिंदूनामावलची वास्तूशांती झाली आहे. त्यामुळे बीडचे वाटोळे झाले आहे. बीडमध्ये काहीही घडू शकते. त्यामुळे आता तर मी या आरोपींना बीडमधून हलवा असे म्हणत आहे, याशिवाय भविष्यात ही केस दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्याची वेळ देखील येईल” असं आमदार धस म्हणाले आहेत.

News Title – Suresh dhas on walmik karad 

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवारांना अडकवण्याचा कराडचा प्लॅन?, बड्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ एकत्र? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ड्रेसिंग रुममधील चर्चेनं भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ, गौतम गंभीर म्हणाला…

सानिया मिर्झा मोहम्मद शमीला करतेय डेट?, दोघांचे स्विमिंगपूलमधले फोटो तूफान व्हायरल

रोहित शर्माची क्रिकेटमधून निवृत्ती?, आताच्या घडीची महत्त्वाची घडामोड

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now