चाहत्यांना धक्का! सूरज चव्हाणचा साखरपुडा; ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

On: June 2, 2025 11:17 AM
Suraj Chavan Engagement
---Advertisement---

Suraj Chavan Engagement | ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण आहे त्याचा साखरपुड्याचा व्हायरल व्हिडीओ! इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सूरज एका मुलीला पाहायला जातो, प्रेमात पडतो आणि थेट साखरपुडा होतो… पण या सगळ्यामागे दडलेलं होतं एक भन्नाट ट्विस्ट! (Suraj Chavan Engagement)

साखरपुडा की फक्त स्वप्न? :

व्हिडीओच्या सुरुवातीला सूरज सुटाबुटात तयार होऊन, आपल्या बहिणीसोबत मुलीच्या घरी पोहोचतो. मुलगी त्याला पाणी देते, नजरानजर होते आणि क्षणार्धात दोघं प्रेमात पडतात. त्यानंतर दोघांचा साखरपुडा होतो – अंगठी देणं-घेणं, आनंदी चेहेरे… हे सर्व पाहून चाहतेही भारावून गेले. पण, व्हिडीओच्या शेवटी खुलासा होतो की हे सगळं फक्त एक स्वप्न होतं! (Suraj Chavan Engagement Video)

Suraj Chavan Engagement | चाहत्यांचा भ्रमनिरास, पण मनोरंजन जोरदार :

व्हिडीओच्या शेवटी सूरज झोपेतून उठतो आणि सर्वांचा भ्रमनिरास होतो. चाहत्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत – “आम्हाला तर खरंच वाटलं होतं!”, “गुलिगत धोका दिलास सूरज!” अशा प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. या क्लिपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी ५’ नंतर ‘झापुक झुपूक’ (Zapuk Zupuk Movie) सिनेमातून प्रमुख अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्रपटाची घोषणा बिग बॉसच्या मंचावरच केली होती. मात्र, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

News Title: Suraj Chavan’s Fake Engagement Video Goes Viral! Netizens Shocked by Twist Ending

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now