बिग बॉसकडून सूरज चव्हाणवर अन्याय; आता थेट…

On: October 2, 2024 2:34 PM
Suraj Chavan
---Advertisement---

Suraj Chavan l बिग बॉस मराठी 5 च्या सिझन अंतिम टप्प्यात आला आहे. कारण यंदाच्या वर्षी बिग बॉस चा हा शो 100 दिवसांचा नसून फक्त 70 दिवसांचा आहे. त्यामुळे येत्या 6 ऑक्टोबर 2024 ला यंदाच्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. मात्र बिग बॉसने हा शो 70 दिवसात संपवायचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांना अत्यंत मोठा धक्का बसला आहे. मात्र आता बिग बॉस चाहते निर्मात्यांवर प्रचंड संपातले आहेत.

बिग बॉसच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप :

हिंदी बिग बॉसचा18 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन संपवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. मात्र अशातच आता बिग बॉसच्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप प्रेक्षकांकडून करण्यात आले आहेत.

बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये सूरज चव्हाण या प्रचंड चर्चेत आहे. कारण सुरजचा चाहतावर्ग खूप आहे. मात्र बिग बॉसच्या घरात सुरजवर मुद्दाम निर्माते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रेक्षकांनी निर्मात्यांवर केला आहे. कारण अभिजीत सावंत याला विजेता करायचे असल्यामुळेच निर्माते सूरज चव्हाणकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.

Suraj Chavan l सूरज चव्हाणकडे दुर्लक्ष :

बिग बॉस मराठीच्या घरात सूरज चव्हाण हा जवळपास सर्वच आठवड्यांमध्ये नॉमिनेशनमध्ये जात आहे. मात्र प्रेक्षक त्याला मोठ्या प्रमाणात वोट करत सुरक्षित करत आहेत. तसेच सूरज चव्हाण हाच बिग बॉस मराठी सिझन 5 चा विजेता होईल असे देखील प्रेक्षकांकडून सांगितले जात आहे. कारण बिग बॉसच्या घरात सर्वात प्रामाणिक सदस्य सूरज चव्हाण हा आहे.

मात्र बिग बॉसच्या निर्मात्यांना अभिजीत सावंत किंवा अंकिता प्रभू वालावलकर यांच्यापैकी एकालाच मराठी सीजन 5 चा विजेता करायचा असल्याने ते सूरज चव्हाणकडे दुर्लक्ष करत आहेत. एवढंच नाही तर त्याला साधे फुटेजमध्ये देखील जास्त दाखवलेजात नसल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक निर्मात्यांवर गंभीर आरोप करत आहेत.

News Title –Suraj chavan big boss news

महत्वाच्या बातम्या-

दिवाळी गिफ्ट! फक्त 13 हजार रुपये भरा आणि iPhone 16 मिळवा

यादी तयार! रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 मोठे नेते पाडणार; कोणी दिला इशारा?

मुंबई मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी, इच्छुक उमेदवारांनी ‘असा’ करावा अर्ज!

‘या’ बड्या नेत्याला घेण्यासाठी जाताना कोसळलं हेलिकॉप्टर; तीन जणांचा मृत्यू

ब्रेकिंग! पुण्यातील ‘या’ भागात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now