ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्वाचे निर्देश!

On: February 12, 2025 9:14 AM
Maharashtra Politics
---Advertisement---

Supreme Court l निवडणूक आयोगाला (Election Commission) ईव्हीएममधील (EVM) मेमरी आणि सिम्बॉल लोडिंग युनिटची पडताळणी करण्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्वाचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने 15 दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले असून, पडताळणीदरम्यान डेटा (Data) नष्ट न करण्याचा आदेश दिला आहे.

डेटा नष्ट न करण्याचा आदेश :

सरन्यायाधीश (Chief Justice) संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, पडताळणीदरम्यान कोणताही डेटा नष्ट करणे किंवा पुन्हा लोड करणे टाळले पाहिजे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (Association for Democratic Reforms – ADR) आणि पराभूत उमेदवार सर्वमित्र कंबोज यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले.

Supreme Court l ईव्हीएम पडताळणी :

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशात म्हटले होते की, ईव्हीएममधील सिम्बॉल लोडिंग युनिट निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर किमान 45 दिवस एका स्ट्राँगरूममध्ये (Strongroom) सीलबंद ठेवणे आवश्यक आहे. 26 एप्रिल 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका ईव्हीएमद्वारे नव्हे तर पुन्हा मतपत्रिकांच्या सहाय्याने घेण्यात याव्यात, ही मागणी फेटाळून लावली होती.

एडीआरच्या (ADR) याचिकेत म्हटले आहे की, आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे न्यायालयाच्या निर्णयाशी सुसंगत नाहीत. एडीआरतर्फे अॅड. प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनी सांगितले की, ईव्हीएमच्या सॉफ्टवेअर (Software) आणि हार्डवेअरची (Hardware) तपासणी व्हायला हवी, तसेच त्यात छेडछाड झाली आहे का, याचा शोध घेतला जावा. ईव्हीएमची जळालेली मेमरी आणि मायक्रो-कंट्रोलर्सच्या (Micro-controllers) पडताळणीसाठी मार्गदर्शक सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन होणे आवश्यक आहे.

एका ईव्हीएमच्या डेटा प्रमाणीकरणासाठी निवडणूक आयोगाकडून 40 हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने लक्ष वेधले. खंडपीठाने म्हटले की, “चाळीस हजार रुपये हे शुल्क खूप जास्त आहे, ते कमी करा.” या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 मार्च रोजी होईल.

न्यायालयाने यापूर्वीच्या निकालात ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता. हरयाणाचे (Haryana) माजी मंत्री करण सिंह दलाल (Karan Singh Dalal) यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी नव्याने दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी घेण्यास नकार दिला, कारण अशीच याचिका आधी फेटाळली होती.

News title : Supreme Court Directs No Deletion of EVM Data Amidst Verification Pleas

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now