Sunita Williams | नासाच्या प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्बल 9 महिन्यांनंतर पुन्हा पृथ्वीवर परतले आहेत. भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3.30 वाजता ते फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. ही लँडिंग स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या पार पडली.
नासाने शेअर केला ऐतिहासिक क्षणाचा व्हिडीओ
नासाने सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पृथ्वीवर पुनरागमनाचा थरारक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या मोहिमेत केवळ विल्यम्स आणि बुच विल्मोरच नाही, तर क्रू-9 चे अन्य दोन अंतराळवीर निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांनीही सहभाग घेतला होता.
सुनीता विल्यम्स यांचा 62 तास 9 मिनिटांचा स्पेसवॉक विक्रम
नासाच्या अधिकृत माहितीनुसार, सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकाच्या बाहेर एकूण 62 तास 9 मिनिटे घालवली, ज्यामध्ये त्यांनी तब्बल 9 वेळा स्पेसवॉक केला. यासोबतच ‘अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला’ हा नवा विक्रमही त्यांनी प्रस्थापित केला आहे.
अंतराळ स्थानकात 900 तास संशोधन करताना त्यांनी 150 हून अधिक प्रयोग यशस्वीरीत्या पूर्ण केले. विशेषतः गुरुत्वाकर्षणाचा द्रव प्रणालींवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आणि पाणी व इंधनाच्या पेशींसाठी नवीन रिअॅक्टर विकसित करण्यावर त्यांचे संशोधन केंद्रित होते. (Sunita Williams)
What a sight! The parachutes on @SpaceX‘s Dragon spacecraft have deployed; #Crew9 will shortly splash down off the coast of Florida near Tallahassee. pic.twitter.com/UcQBVR7q03
— NASA (@NASA) March 18, 2025
5 जून 2024 रोजी अंतराळ मोहिमेवर गेल्या होत्या विल्यम्स
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंग स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून अंतराळात प्रवास केला होता. त्यांचा हा प्रवास केवळ 8 दिवसांचा असणार होता. मात्र, अंतराळ स्थानकात काही तांत्रिक बिघाड झाल्याने नासाला स्टारलाइनर रिकामे करावे लागले आणि अंतराळवीरांना अधिक काळ अवकाशात थांबावे लागले. अखेर 9 महिन्यांनंतर त्यांनी पृथ्वीवर पुनरागमन केले आहे.
Title : Sunita Williams Returns After 9 Months Successful Landing in Florida






