अजित पवार गटाचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? ‘या’ नेत्याचा मोठा आरोप

On: June 1, 2024 8:15 AM
Ajit Pawar
---Advertisement---

Maharashtra l येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे दोन्ही गट सतत एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

लोकसभा निकालानंतर सुनील तटकरे भाजपमध्ये जाणार :

गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये सातत्याने या ना त्या कारणावरुन राजकीय खलबतं पाहायला मिळतात. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार यांच्या पक्षातील काही नेते काँग्रेसमधील जातील असे तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे युवकचे नेते मेहबुब शेख यांनी भूमिका मांडली आहे.

येत्या 4 जूनच्या लोकसभा निकालानंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार बाहेर पडणार आहेत. कारण 4 जूननंतर अजितदादा गटाची नौका बुडणार आहे. त्या बुडणाऱ्या नौकेत आता कोणी ही बसणार नाही. म्हणून स्वतः सुनील तटकरे हे देखील भारतीय जनता पार्टीच्या नावेत बसण्याची तयारी करत आहेत असे मेहबुब शेख यांनी म्हटलं आहे.

Maharashtra l शरद पवार साहेबांकडे एंट्री मिळणार नाही :

शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटातील मोठा गट काँगेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. तटकरेंच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच मेहबूब शेख म्हणाले की, अजित पवार गटाच्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीत जाण्याशिवाय काहीही पर्याय नाही. कारण त्यांना माहित आहे की, आता आपल्याला शरद पवार साहेबांकडे एंट्री कधीही मिळणार नाही.

जे लोक अध्यक्ष शरद पवार साहेबांवर, सिल्व्हर ओकवर प्रेम करत आहेत तेवढीच लोक आता आमच्या पक्षात शिल्लक राहिली आहेत. जे जाणारे होते ते आता निघून गेलेले आहेत. त्यामुळे आता कोणी ही जाणार नाही. तसेच आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड आणि स्टेटमेंट हे अजित पवार गटाचे नेते मंडळी करत असल्याचे मेहबुब शेख यांनी म्हटलं आहे.

News Title – Sunil Tatkare of Ajit Pawar group is preparing to join BJP

महत्वाच्या बातम्या-

या तीन राशींचे जून महिन्यात नशीब उजळणार; मिळेल सुख, समृद्धी अन् संपत्ती

अभिनेता सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; पोलिसात तक्रार दाखल

शरद पवारांना सर्वात मोठा धक्का बसणार?; ‘या’ नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

“मोदी पंतप्रधान होणार नाहीत, लोकांनी केवळ स्टंट म्हणून त्यांच्याकडे पाहावं”

ऐश्वर्या नाही तर ‘या’ अभिनेत्रीसाठी सलमानने तोडली होती ‘नो किसिंग पॉलिसी’

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now