Pune Crime News | राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना गुन्हेगारी घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोलापूर, अकोला आणि खोपोलीतील घटनांनंतर आता पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात घडलेल्या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकांच्या काळात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यातील वडगाव शेरी (Wadgaon Sheri Clash) भागातील सोपाननगर (Sopannagar) परिसरात काल रात्री उशिरा दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. या घटनेदरम्यान रस्त्यावर दगडफेक आणि मारामारी झाल्याचे समोर आले असून, या गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निवडणुकीच्या काळात अशा घटनांमुळे पोलिस प्रशासनावरील ताण अधिकच वाढताना दिसत आहे.
सोपाननगरमध्ये दगडफेक, परिसरात भीतीचे वातावरण :
व्हायरल व्हिडिओमध्ये काही तरुण एकमेकांवर मोठमोठे दगड फेकताना स्पष्टपणे दिसत आहेत. रस्त्यावर दुचाकी पडलेल्या अवस्थेत असून संपूर्ण परिसरात गोंधळाचे दृश्य पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे सोपाननगर (Sopannagar) परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी या घटनेमुळे भीती व्यक्त करत भयमुक्त आणि दहशतमुक्त वडगाव शेरीची मागणी जोर धरू लागली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या हिंसक घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे मत आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांकडून हालचाली वाढवण्यात आल्या असल्याचे चित्र दिसत आहे. (Wadgaon Sheri Clash)
Pune Crime News | पोलीस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष :
महानगरपालिका निवडणुका सुरू असल्याने पुणे पोलिसांवर मोठा ताण असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावणाऱ्या घटनांवर कठोर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. व्हायरल व्हिडिओतील तरुणांवर पोलिस कोणती कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Pune Crime News)
दरम्यान, निवडणुकांच्या काळात राज्यातील विविध भागांत राजकीय वादातून तणावाच्या घटना घडत असल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुण्यातील या घटनेनंतर निवडणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था कशी राखली जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.






