Postal service | पिंपरी-चिंचवडची टपाल सेवा आता अधिक सुलभ आणि सोयीस्कर झाली आहे. पुणे शहर पिंपरी चिंचवड (PCMC) शहरात पूर्व विभागाच्या माध्यमातून चिंचवड पूर्व टपाल कार्यालयात एक नवीन उपक्रम भारतीय टपाल विभागाने सुरु केली आहे. ज्यामुळे नागरिकांना टपाल सेवा अधिक सोयीची होणार आहे.
नेमकं बदल काय आहेत :
पूर्वी टपाल सेवा फक्त कार्यालयीन वेळेत सुरु असायची पण आता ही सेवा सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत चालू राहील. हा उपक्रम ऑफिस वर्क करणाऱ्या लोकांना सुलभ ठरणार आहे. यामुळे आता नागरिकांना कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही स्पीड पोस्ट, पार्सल आणि पत्र पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. (Speed Post & Parcel Facility For Pimpri Chinchwad)
या सुविधेअंतर्गत नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. त्यामुळे नागरिक सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत कुठल्याही वेळेत स्पीड पोस्ट, पत्र आणि पार्सल बुक करू शकतात. ही सुविधा टपाल सेवा नागरिकांसाठी अजून सोपी व्हावी यासाठी सुरु करण्यात आली आहे.
नागरिकांना मोठा फायदा होणार :
ऑफिस टाइम्स (Office Time) किंवा कार्यालयीन वेळेत व्यस्त असणाऱ्या नागरिकांना मोठी मदत होईल. आधी नागरिकांना कार्यालयीन वेळेतच पार्सल द्यावे लागायचे त्यामुळे नागरिकांना अडचणी येत होत्या.
टपाल कार्यालयात सुरु केलेल्या या उपक्रमामुळे व्यवसायिक तसेच व्यक्तिगत नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. उद्योगधंद्यासाठी स्पीड पोस्ट आणि पार्सल पाठवणे खूप महत्वाचे असते.
News title : Speed Post & Parcel Facility For Pimpri Chinchwad






