कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर! अभिनेत्रीने 24 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

On: February 17, 2025 1:59 PM
South Korean Actress Kim Sae Ron Found Dead At Her House
---Advertisement---

Actress Kim Sae Ron | कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 24 वर्षीय अभिनेत्री किम साई रॉनचा (Kim Sae-ron) मृत्यू झाला असून तिचा मृतदेह घरात सापडला. अभिनेत्रीच्या मैत्रिणीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. (Actress Kim Sae Ron)

किम साई रॉनच्या निधनाने कोरियन इंडस्ट्रीत शोक

किम साई रॉनच्या (Kim Sae-ron) निधनाची बातमी समजताच कोरियन चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ही अभिनेत्री बऱ्याच काळापासून पोलिसांच्या गुन्ह्यात अडकली होती आणि तिच्याविरुद्ध अनेक खटलेही सुरू होते. अशात तिच्या निधनाच्या बातमीने भारतीय चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 24 वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी सापडला. तिच्या मैत्रिणीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांकडून तपासाला सुरुवात

कोरियन माध्यमांनुसार, पोलिसांनी अभिनेत्रीच्या घरात कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा गैरप्रकार झाल्याची शक्यता नाकारली आहे. घराची दारे-खिडक्या बंद होत्या आणि तिचा मृतदेह आतमध्ये आढळून आला. किम साई रॉनच्या (Kim Sae-ron) मृत्यूच्या कारणांचा पोलीस तपास करत आहेत. तिच्या मृत्यूमध्ये आणखी कोणी सामील आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

2022 मधील घटना

2022 मध्ये, किमवर (Kim Sae-ron) इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला धडक दिल्यानंतर दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात तिला अटक करण्यात आली होती, परंतु नंतर तिने आणि तिच्या एजन्सीने पत्राद्वारे या घटनेबद्दल माफी मागितली. ज्यांचे नुकसान झाले होते, त्यांना तिने भरपाई दिली. नुकसान भरून काढण्यासाठी ती एका कॅफेमध्ये अर्धवेळ काम करत होती, असे म्हटले जाते.

किम साई रॉनने (Kim Sae-ron) ‘अ ब्रँड न्यू लाईफ’, ‘द मॅन फ्रॉम नोव्हेअर’, ‘ब्लडहाऊंड’ यांसारख्या प्रसिद्ध शोमध्ये काम केले आहे. कमी वयातच तिला प्रसिद्धी मिळाली होती. मात्र, तिच्या अकाली निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Title : South Korean Actress Kim Sae Ron Found Dead At Her House

 

Join WhatsApp Group

Join Now