सूर्यवंशम फेम अभिनेत्रीचा मृत्यू अपघात नसून हत्या?; 22 वर्षांनंतर मोठा खुलासा

On: March 13, 2025 9:49 AM
Soundarya Death FIR Against Actor Mohan Babu
---Advertisement---

Soundarya Death | 1999 साली प्रदर्शित झालेला ‘सूर्यवंशम’ (Sooryavansham) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) जरी अयशस्वी ठरला, तरीही टेलिव्हिजनवर (Television) सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला. या चित्रपटातील अभिनेत्री सौंदर्या हिच्या मृत्यू प्रकरणाला 22 वर्षांनंतर नवे वळण लागले आहे. (Soundarya Death)

सौंदर्याचा मृत्यू आणि नवा खुलासा

‘सूर्यवंशम’ हा तमिळ चित्रपटाचा रिमेक (Remake) होता. यात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी हीरा ठाकूर आणि भानुप्रताप सिंह अशा दुहेरी भूमिका साकारल्या, तर सौंदर्याने राधाची भूमिका साकारली होती. 17 एप्रिल 2004 रोजी वयाच्या 31 व्या वर्षी विमान अपघातात (Plane Crash) सौंदर्याचा मृत्यू झाला. मात्र, आता 22 वर्षांनंतर तिचा मृत्यू अपघात नसून हत्या असल्याचा दावा करण्यात येत आहे.

सौंदर्याच्या मृत्यूप्रकरणी टॉलीवूडचे (Tollywood) ज्येष्ठ अभिनेते मोहन बाबू यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. सौंदर्याच्या मृत्यूमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मालमत्तेच्या वादातून हा खून झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. विमान अपघातानंतर मोहन बाबू यांनी बेकायदेशीरपणे जमीन बळकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

तक्रारदाराची मागणी

तक्रारदार चित्तमुल्ला यांनी मांचू मनोजला (Manchu Manoj) न्याय देण्याची मागणी केली आहे, तसेच जलपल्ली येथील 6 एकर जागेत बांधलेले अतिथीगृह जप्त करण्याची मागणी केली आहे. मोहन बाबू यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे सांगत, तक्रारदाराने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. (Soundarya Death)

सौंदर्याचे खरे नाव सौम्या सत्यनारायण होते. त्यांनी कन्नड, तमिळ, तेलगू, हिंदी आणि मल्याळम अशा पाच भाषांमधील 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. 1999 मध्ये ‘सूर्यवंशम’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले.

Title : Soundarya Death FIR Against Actor Mohan Babu After 22 Years

 

Join WhatsApp Group

Join Now