Sonakshi Sinha Brother | बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही अभिनेते, राजकारणी शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha Sons) यांची मुलगी आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनाक्षीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असला, तरी तिच्या प्रोफेशनल करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्याचीच अधिक चर्चा होताना दिसते. विशेषतः जहीर इक्बालसोबत केलेल्या विवाहानंतर ती सतत चर्चेत राहिली.
सोनाक्षीच्या लग्नावेळी तिचे जुळे भाऊ लव आणि कुश सिन्हा उपस्थित नव्हते, यामुळे अनेक तर्कवितर्क लावले गेले. तिचं लग्न त्यांना मान्य नव्हतं, अशा चर्चांनाही उधाण आलं होतं. मात्र या विषयावर सिन्हा कुटुंबीयांनी किंवा लव-कुश यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, आता सोनाक्षीच्या भावांबाबत एक जुना पण रंजक खुलासा समोर आला आहे.
रामायणमधील लव-कुशसाठी शत्रुघ्न सिन्हांच्या मुलांचा विचार :
रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरली आहे. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या मालिकेने घराघरात रामकथेचा प्रसार केला. राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान या भूमिका साकारणारे कलाकार आजही लोकांच्या स्मरणात आहेत. (Luv Kush Ramayan)
या मालिकेतील उत्तरकांडात येणारी लव-कुश ही पात्रे अत्यंत महत्त्वाची होती. रामानंद सागर यांनी सुरुवातीला या भूमिकांसाठी अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या जुळ्या मुलांना लव आणि कुश सिन्हा कास्ट करण्याचा विचार केला होता. मात्र काही कारणांमुळे ही संधी त्यांना मिळू शकली नाही.
Sonakshi Sinha Brother | टॅक्सी ड्रायव्हरच्या गोष्टीतून सापडले लव-कुश
यानंतर रामानंद सागर यांनी दुसऱ्या बाल कलाकारांचा शोध सुरू केला. अखेरीस महाराष्ट्रातील दोन मुलांची निवड करण्यात आली. स्वप्नील जोशी यांनी कुशची, तर मयुरेश क्षेत्रमडे यांनी लवची भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयाने आणि निरागस चेहऱ्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. (Sonakshi Sinha Brother)
एका मुलाखतीत रामानंद सागर यांनी सांगितलेला हा किस्सा विशेष चर्चेत आहे. कानपूरला जाताना ‘लव-कुश’ नावाची टॅक्सी पाहून त्यांनी उत्सुकतेपोटी चौकशी केली. त्या टॅक्सी ड्रायव्हरच्या बॉसच्या मुलांची नावं लव आणि कुश असल्याचं समोर आलं. मात्र ऑडिशन आणि शूटिंगदरम्यान अडचणी आल्याने त्या मुलांना कास्ट करण्यात आलं नाही. अखेरीस दुसऱ्या कलाकारांची निवड झाली आणि रामायणमधील लव-कुश अजरामर झाले. अन्यथा सोनाक्षीप्रमाणेच तिचे दोन्ही भाऊही आज अभिनय क्षेत्रात दिसले असते.






