Solapur Red Alert | मराठवाड्यानंतर सोलापूरकरांसाठी देखील चिंताजनक बातमी समोर आली आहे. गेल्या काही कालावधीत महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात पूर आणि अतिवृष्टी पाहायला भेटली. अनेक जिल्ह्यांना याचा झटका बसला आहे. सरकार त्यावर कामं करत आहे. या दरम्यानच सोलापूरमध्येही अशीच काही परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. ग्लोबल फोरकास्ट सिस्टिमकडून आलेल्या इशाऱ्यानुसार सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसांसाठी रेड अलर्ट (Maharashtra Red Alert) देण्यात आला आहे. सोलापूर शहरात आणि काही ग्रामीण भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शनिवारी, 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत सहा तास आणि रात्री 8 ते 12 असे 4 तास भरपूर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रविवारी 28 सप्टेंबर रोजी रात्री 12 नंतर सकाळी 6 वाजेपर्यंत ग्लोबल फोरकास्ट सिस्टिमने रेड अलर्ट दिला आहे. (Solapur Rain Red Alert News)
सोलापुरात परिस्थिती गंभीर :
गुरुवारपासूनच सोलापुरात पावसाचे आगमन झाले होते. गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पाऊस झाला. पाऊस कधी जोरदार तर कधी रिपरिप सुरु होती. सततच्या पावसामुळे सोलापूरमध्ये नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागले.
एवढेच नाही तर सोलापुरात शुक्रवारी तापमान अचानक खाली गेले. कमाल आणि किमान तापमान एकाच पातळीवर आले होते. त्यामुळे चिंताजंक वातावरण निर्माण झाले आहे.
Solapur Red Alert | दोन दिवसांनी पूर येण्याची शक्यता :
मराठवाडा (Marathwada) आणि सोलापूरमध्ये (Solapur) पुढील दोन दिवसात अतिवृष्टीची शक्यता दर्शवण्यात आली आहे. जर मुसळधार पाऊस झाला तर जिल्ह्यात पूर येण्याच्या संभावना आहेत. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. कोल्हापूर (Kolhapur) आणी सांगलीकडून (Sangli) नवीन बचावपथके देखील बोलावण्यात आली आहेत. नागरिकांना ही प्रशासनाने निर्देश जारी केले आहेत.
माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये महापुरामुळे नुकसान झाले आहे. आता पुन्हा पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. रेड अलर्टच्या परिस्थितीत प्रशासन सतर्क असून संबंधित प्रांतच्या अधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवार पर्यंत एनडीआरएफ आणि लष्करी पथक सोलापुरात थांबणार आहेत.
News title : Solapur Rain Red Alert News








