Social Media Influencer | आसाममधील (Assam) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन (Archita Phukan), जी ‘बेबीडॉल आर्ची’ (Babydoll Archie) या नावानेही ओळखली जाते, तिच्या एका धक्कादायक खुलाश्याने आणि एका प्रसिद्ध व्यक्तीसोबतच्या भेटीमुळे सध्या चर्चेत आहे. तिने एकेकाळी वेश्याव्यवसायात अडकल्याचे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी २५ लाख रुपये मोजल्याचे उघड केले आहे.
काय म्हणाली अर्चिता?
अर्चिताने २०२३ मध्ये एका इंस्टाग्राम (Social Media Influencer) पोस्टद्वारे तिच्या वेदनादायक भूतकाळाबद्दल सांगितले होते. तिने खुलासा केला होता की, तिला सहा वर्षे वेश्या म्हणून काम करण्यास भाग पाडले गेले होते. या कचाट्यातून सुटण्यासाठी तिला २५ लाख रुपये देऊन स्वतःची सुटका करून घ्यावी लागली होती. तिच्या या कबुलीमुळे मोठी खळबळ उडाली होती.
काही महिन्यांपूर्वी, अर्चिताने अमेरिकन अडल्ट स्टार केंद्रा लस्टसोबतचे (Kendra Lust) तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली. या फोटोंमध्ये (Social Media Influencer) दोघींनी एकसारखे कपडे घातले होते. केंद्रासोबतच्या भेटीचा अनुभव चांगला असल्याचे सांगत, तिच्या आत्मविश्वास आणि व्यावसायिकतेने आपण प्रेरित झाल्याचे अर्चिताने म्हटले. या भेटीनंतर तिने केंद्रासोबत भविष्यात कोलॅबोरेशन करण्याचे संकेतही दिले होते.
ते फोटो शेअर केल्याने खळबळ-
या फोटोनंतर, अर्चिता अडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे का, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली. आपल्या बोल्ड कंटेंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या अर्चिताने आंतरराष्ट्रीय पॉर्न स्टारसोबत फोटो शेअर केल्याने या चर्चांना अधिकच उधाण आले. मात्र, अर्चिताने अद्याप यावर कोणतेही थेट भाष्य केलेले नाही.






