…म्हणून दीपिका-सलमान आजपर्यंत चित्रपटात एकत्र आले नाहीत

On: December 27, 2022 3:24 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूडचा(Bollywood) सुपरस्टार आणि भाईजान म्हणून ओळख असलेला अभिनेता सलमान खान(Salman Khan) नेहमीच चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटामुळं तर कधी खासगी आयुष्यामुळं. मंगळवारी सलमानचा वाढदिवस(Salman Khan Birthday) असल्यानं तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सलमाननं आजपर्यंत अनेक नवीन अभिनेत्रींना त्याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली आहे. सलमानसोबत काम करावं, असं जवळपास प्रत्येक अभिनेत्रींचं स्पप्न असतं. परंतु दीपिका पादुकोन (Deepika Padukone) सिनेसृष्टीत येऊन कित्येक वर्षे झाले तरी दीपिका-सलमान आजपर्यंत एका चित्रपटात दिसले नाहीत.

दीपिका बाॅलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तिचे असंख्य चाहते आहेत. दीपिकानं केवळ बाॅलिवूडच नाही तर हाॅलिवूडमध्येही मजल मारली आहे. परंतु या दीपिकानं सलमानसोबत काम करण्यास नेहमी नकार दिला आहे.

एका मुलाखतीत दीपिकाला सलमानसोबत मोठ्या पडद्यावर न दिसण्याचं कारण विचारण्यात आलं होतं. यावेळी ती म्हणाली होती की, मी सलमानसोबत काम करायला नकार दिला आहे. मला असं वाटतं की, आमची केमिस्ट्री फार जुळणार नाही.

परंतु सलमान आणि माझ्यात चांगली मैत्री आहे, असंही दीपिका म्हणाली होती. दीपिकानं चक्क सलमानसोबत काम करण्यास नकार दिल्यानं त्यावेळी अनेकांना धक्का बसला होता.

दरम्यान, त्या दोघांत चांगली मैत्री असल्याचं ते सांगत असले तरी त्या दोघांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा नेहमीच सोशल मीडियावर होत असतात.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now