Snapchat वापरकर्त्यांनो लक्ष द्या! ‘या’ फीचरसाठी मोजावे लागणार पैसे

On: October 7, 2025 5:41 PM
Snapchat
---Advertisement---

Snapchat | सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपचॅटने आपल्या लोकप्रिय ‘मेमरीज’ फिचरवर शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१६ पासून हे फिचर पूर्णपणे मोफत होते, पण आता कंपनीने ५जीबी पर्यंत मोफत स्टोरेज देऊन त्या नंतर वापरकर्त्यांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये चर्चा रंगली असून अनेकांनी या पावलावर नाराजी व्यक्त केली आहे. (Snapchat Charges)

5GB पर्यंत फ्री, त्यानंतर मासिक शुल्क लागू :

स्नॅपचॅटने आपल्या ‘मेमरीज’ फीचरमध्ये मोठा बदल करत ५ जीबीपर्यंतचा डेटा स्टोरेज मोफत ठेवला आहे. पण, या मर्यादेपेक्षा जास्त डेटा साठवण्यासाठी वापरकर्त्यांना आता पैसे द्यावे लागतील. अहवालानुसार, कंपनीने सशुल्क प्लॅनची घोषणा केली असून १०० जीबीचा प्लॅन दरमहा १.९९ डॉलर (सुमारे ₹१७६) आणि २५० जीबीचा प्लॅन दरमहा ३.९९ डॉलर (सुमारे ₹३५४) इतका ठेवला आहे.

हा बदल टप्प्याटप्प्याने जगभरातील युजर्ससाठी लागू केला जाणार आहे. जे युजर्स आधीच ५ जीबीपेक्षा जास्त डेटा साठवून आहेत, त्यांना १२ महिन्यांचा तात्पुरता प्रवेश मिळेल आणि त्या कालावधीत ते आपला डेटा डाउनलोड करू शकतील. या बदलामुळे अनेकांना आपल्या आठवणी सुरक्षित ठेवण्यासाठी आता अतिरिक्त खर्चाचा विचार करावा लागेल.

Snapchat | युजर्सची नाराजी :

स्नॅपचॅटच्या या निर्णयावर सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी कंपनीवर “लोभाची नवी पायरी” म्हणून टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, इतकी वर्षे मोफत सेवा देऊन आता अचानक शुल्क आकारणे अन्यायकारक आहे. काहींनी तर हे “डिजिटल आठवणींवर कर” असल्याचंही म्हटलं आहे. (Snapchat Charges)

दरम्यान, कंपनीचे म्हणणे आहे की विनामूल्य सेवेतून सशुल्क सेवेकडे जाणे हा व्यवसायाचा नैसर्गिक प्रवास आहे. स्नॅपचॅटचा उद्देश युजर्सना अधिक चांगला अनुभव आणि उच्च दर्जाची सुरक्षा देणे आहे. तसंच, इतर मोठ्या टेक कंपन्या — जसे Google आणि Apple — त्यांच्या क्लाऊड स्टोरेज सेवांसाठी शुल्क आकारतात, त्याच धर्तीवर स्नॅपचॅटही ही पद्धत अवलंबत आहे.

तज्ज्ञांचे मत आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भविष्यात इतर फीचर्ससाठीही शुल्क आकारू शकतात. जाहिरातींव्यतिरिक्त उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे ही कंपन्यांची गरज बनली आहे. स्नॅपचॅटने नुकतेच ‘लेन्स+’ नावाचे ९ डॉलरचे प्रीमियम फिचर आणले आहे, जे विशेष AR इफेक्ट्स देते. त्यामुळे ‘मेमरीज’ फीचरवर शुल्क लावणे हे कंपनीसाठी पुढचे व्यावसायिक पाऊल मानले जात आहे.

News title : Snapchat charges for this feature

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now