Palash Muchhal | भारतीय महिला क्रिकेटमधील लोकप्रिय चेहरा स्मृती मानधना आणि तिचा प्रियकर पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्या लग्नाला अचानक मोठा ब्रेक लागल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत दोघांचे लग्न होणार होते. संगीत, मेहंदी आणि हळद यांसारखे सर्व कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडले. भारतीय महिला संघातील खेळाडूही या समारंभात उपस्थित असून अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण मुख्य विधीच्या काही मिनिटे आधी लग्न थांबवण्यात आल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला. (Smriti Mandhana wedding)
सुरुवातीला माहिती मिळाली की स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. हृदयविकाराची लक्षणे दिसल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले, असे सांगण्यात आले. मात्र, या घटनेनंतर काही तासांतच पलाश मुच्छल यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली. यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली.
व्हायरल फोटो–चॅट्सने वाढवला गोंधळ, लग्नाबद्दल अद्याप मौन :
या प्रकरणात मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा सोशल मीडियावर पलाशच्या चॅटिंगचे काही स्क्रीनशॉट्स आणि फोटो व्हायरल झाले. त्यात तो स्मृती मानधनाला धोका देत असल्याचा दावा केला जात आहे. हे स्क्रीनशॉट्स खरे की खोटे, याबद्दल अधिकृत माहिती नसली तरी लग्न अचानक थांबवण्याशी या चर्चांचा संबंध जोडला जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्मृतीचे वडील घरी परतले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. पण स्मृती आणि पलाशच्या कुटुंबियांनी किंवा स्वतः दोघांनीही लग्नाबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही. या शांततेमुळे चर्चा, अफवा आणि शंका अधिकच वाढल्या आहेत. दुसरीकडे स्मृती मानधना विदेशात होणाऱ्या आगामी क्रिकेट सामन्यासाठी जाणार असल्याचेही समोर आले आहे.
Palash Muchhal | लग्न थांबल्यावर पलाशचा अनपेक्षित निर्णय :
लग्न अचानक पुढे ढकलल्यानंतर आणि वाद वाढल्यानंतर आता पलाश मुच्छलने (Palash Muchhal) एक अनपेक्षित निर्णय घेतला आहे. त्याने इंस्टाग्रामवर आपल्या बायोमध्ये सुरक्षाकवचचा इमोजी ठेवला आहे. कोणाची नजर लागू नये म्हणून हा बदल केल्याचे दिसत आहे. हा निर्णय त्याने सर्व चर्चांच्या तोंडावर घेतल्याने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
याचप्रमाणे स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana wedding) वडिलांनी देखील इंस्टाग्राम बायोमध्ये आधीच हा इमोजी ठेवला होता. आता पलाशनेही तसाच इमोजी ठेवताच सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. लग्न स्थगित झाल्यापासून पलाश सतत वादात अडकत आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय दिसत असला तरी लग्नाबद्दल किंवा व्हायरल चर्चांबद्दल तो एकही शब्द बोलत नाही.






