स्मिता पाटीलच्या मृत्यूची काळजाला घायाळ करणारी कहाणी!

On: March 27, 2025 4:21 PM
Smita Patil death story
---Advertisement---

Smita Patil death story l अभिनय, सौंदर्य आणि नजाकतीचं मूर्तिमंत रूप म्हणजे स्मिता पाटील. मराठी असो वा हिंदी चित्रपट, तिच्या उपस्थितीने पडद्यावर एक वेगळीच ऊर्जा असायची. पण हीच अभिनेत्री अवघ्या 31 व्या वर्षी हे जग सोडून गेली आणि संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरून गेली. तिच्या मृत्यूमागचं वास्तव आजही चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू आणतं.

मातृत्वाचा आनंद आणि केवळ 15 दिवसांतच मृत्यू :

28 नोव्हेंबर 1986 रोजी स्मिताने एका गोंडस मुलाला जन्म दिला, प्रतीक बब्बर. मातृत्वाचा तो आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. डिलिव्हरीनंतर स्मिताच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला. सतत रक्तस्त्राव, उलट्या आणि चेहरा पांढरट – तिची स्थिती दिवसागणिक गंभीर होत गेली.

12 डिसेंबर रोजी तिची प्रकृती पूर्णपणे ढासळली आणि ती कोमात गेली. डॉक्टरांची टीम उपचार करत होती, पण शेवटी 13 डिसेंबर 1986 रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या जाण्याने चित्रपटसृष्टीच नव्हे तर सर्वसामान्यांनाही मोठा धक्का बसला होता.

Smita Patil death story l वधूसारखा निरोप – शेवटची इच्छा पूर्ण केली :

स्मिता पाटीलने तिच्या कुटुंबीयांना मृत्यूपूर्वी एक विनंती केली होती – “माझे अंत्यसंस्कार वधूसारखे करा.” तिच्या या अंतिम इच्छेला आदर देत, तिला सुंदर कपडे घालून, केसांत फुले माळून वधूसारखा निरोप देण्यात आला. तो क्षण प्रत्येकासाठी काळजाला चटका लावणारा होता.

स्मिता आणि राज बब्बर यांच्या नात्याची बरीच चर्चा होती. राज आधीपासून विवाहित होते, पण तरीही त्यांनी स्मिताशी नातं स्वीकारलं. त्यांच्या प्रेमातही वाद होते आणि तणावही. विशेष म्हणजे स्मिताच्या मृत्यूनंतर राज बब्बर पुन्हा त्यांच्या पहिल्या पत्नी नादिरा बब्बरकडे परतले.

प्रतीक बब्बर – आईच्या आठवणीचं जिवंत रूप :

स्मिताचा मुलगा प्रतीक बब्बर आज अभिनेता आहे. त्याने अलीकडे प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं, पण त्याच्या वडिलांनी या लग्नाला हजेरी लावली नाही. त्यांच्या नात्यातील अंतर पुन्हा एकदा चर्चेत आलं. प्रतीकने आपल्या आईच्या सन्मानार्थ स्वतःचं नाव बदलून ‘प्रतीक स्मिता पाटील’ असं ठेवलं, हीच आईला त्याची खरी श्रद्धांजली.

News Title: Smita Patil’s Painful Death: Bleeding, Coma & a Final Farewell Like a Bride

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now