शुबमन गिल पंचांशी का भिडला? कारण आलं समोर

On: May 3, 2025 10:10 AM
IPL Umpires Salary
---Advertisement---

Shubman Gill umpire controversy | आयपीएल 2025 च्या 51व्या सामन्यात गुजरात टायटन्सने हैदराबादचा 38 धावांनी पराभव केला. मात्र सामना जितकाही चर्चेत राहिला, तितकाच शुबमन गिलचा (Shubhman Gill) पंचांशी झालेला वादही चर्चेचा विषय ठरला. गुजरात टायटन्सने (GT) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) 224 धावांचा डोंगर उभारून सामना सहज जिंकला. मात्र सामन्यात दोन घटनांनी लक्ष वेधलं एक शुबमन गिलचा रनआउट संदर्भात पंचांशी वाद आणि दुसरा हैदराबादच्या डावात डीआरएस निर्णयावरून गोंधळ. शुबमन गिलला रनआउट दिल्यानंतर त्याने पंचांशी थेट चर्चा केली, तर दुसरीकडे अभिषेक शर्मा एलबीडब्ल्यू निर्णयावर संतापला.

“भावना असतात, पण तो मुद्दा संपला” – गिलचं स्पष्टीकरण :

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिल म्हणाला, “माझी थोडीशी चर्चा झाली, पण ते क्षणातलं होतं. कधी कधी भावना अनावर होतात कारण तुम्ही 110 टक्के देत असता.” गिलने स्पष्ट केलं की कोणताही वैयक्तिक राग नव्हता, फक्त खेळातील तणावामुळे हा प्रसंग घडला. (Shubman Gill umpire controversy)

तसेच, गिलने त्यांच्या संघाच्या कामगिरीचंही कौतुक केलं. “आम्ही फारशा निर्धाव चेंडू टाकले नाहीत. आम्हाला माहित होतं की काळ्या मातीच्या खेळपट्टीवर षटकार मारणं कठीण असतं, पण मी, साई आणि जोसने खेळपट्टीच्या प्रकृतीनुसार खेळ रचला आणि मोठं स्कोअर उभारलं.”

Shubman Gill umpire controversy | क्षेत्ररक्षण सुधारलं, प्लेऑफ जवळ :

गिल पुढे म्हणाला, “प्रत्येक सामन्यापूर्वी आम्ही क्षेत्ररक्षणाबद्दल बोलतो. आज आम्ही ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत.” संघाच्या सामूहिक प्रयत्नामुळेच विजय मिळवता आला असल्याचं त्याने सांगितलं. (Shubman Gill umpire controversy)

या विजयामुळे गुजरात टायटन्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पुढील एक सामना जिंकताच त्यांचं प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

News Title: Shubman Gill Reacts After Umpire Controversy in Match Against SRH

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now