Shraddha Kapoor | बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) श्रद्धा कपूरने ‘स्त्री २’ (Stree 2) चित्रपटाच्या यशानंतर तिचे वडील शक्ती कपूर यांच्यासोबत मुंबईत (Mumbai) कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली आहे. आलिशान कारनंतर (Luxurious Car) आता त्यांनी आलिशान घरासाठी मोठी रक्कम खर्च केली आहे. सध्या ती तिच्या आई-वडिलांसोबत (Parents) राहते. पण, या नवीन घरी ती लवकरच राहायला जाण्याची (Shift) शक्यता आहे. (Shraddha Kapoor)
नवीन घरासाठी मोजली ‘इतकी’ रक्कम
मीडिया रिपोर्ट्सनुसार (Media Reports), शक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या या मालमत्तेची किंमत ६.२४ कोटी रुपये (6.24 Crore Rupees) आहे. हा एक लक्झरी अपार्टमेंट (Luxury Apartment) आहे, जो त्यांनी या किमतीत विकत घेतला आहे. हे पिरामल महालक्ष्मी साउथ टॉवर (Piramal Mahalaxmi South Tower) येथे असून त्याची नोंदणी (Registration) १३ जानेवारी २०२५ रोजी झाली होती. १०४२.७३ स्क्वेअर फूटमध्ये (Square Feet) पसरलेल्या या अपार्टमेंटमध्ये दोन बाल्कनी (Balconies) आहेत आणि त्याची प्रति स्क्वेअर फूट किंमत ५९,८७५ रुपये आहे.
भाड्यानेही (Rent) घेतले होते अपार्टमेंट (Apartment)
पिरमल महालक्ष्मी साउथ टॉवर रेस कोर्स (Race Course) आणि समुद्राच्या (Sea) दृश्यासाठी (View) प्रसिद्ध असून तिथे 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट्स (Flats) आहेत. श्रद्धा कपूरने २०२४ मध्ये जुहूच्या (Juhu) हाय एंड रेसिडेन्शिअल टॉवरमध्ये (High End Residential Tower) ६ लाख रुपये प्रति महिना भाड्याने एक लक्झरी अपार्टमेंट घेतला होता. Zapkey ने अॅक्सेस (Access) केलेल्या कागदपत्रांनुसार (Documents), अंदाजे ३९२८.८६ चौरस फुटांचे हे अपार्टमेंट एका वर्षासाठी भाडेतत्त्वावर (Lease) घेतले होते. अभिनेत्रीने ७२ लाख रुपये अॅडव्हान्स (Advance) दिले होते. त्यात ४ पार्किंग क्षेत्रांचाही (Parking Areas) समावेश होता. त्यासाठी त्यांनी ३६ हजार रुपये स्टॅम्प ड्युटी (Stamp Duty) आणि १००० रुपये रजिस्ट्रेशन फी (Registration Fee) भरली होती. (Shraddha Kapoor)
वर्कफ्रंट (Workfront)
श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) ‘आशिकी २’ (Aashiqui 2), ‘बागी’ (Baaghi), ‘छिछोरे’ (Chhichhore) आणि ‘स्त्री २’ (Stree 2) सारख्या चित्रपटांत काम केले आहे. ती १२ वर्षांपासून इंडस्ट्रीत (Industry) कार्यरत (Active) आहे. जरी तिच्या नावावर जास्त हिट्सची (Hits) नोंद नाही, पण ती लोकांच्या मनावर राज्य करते. सोशल मीडियावर (Social Media) तिचे फॅन फॉलोअर्स (Fan Followers) सर्वाधिक आहेत. ‘फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १००’ (Forbes India Celebrity 100) च्या यादीत ती ५७ व्या क्रमांकावर होती.
Title : Shraddha Kapoor buys a luxurious apartment in Mumbai with father Shakti Kapoor






