Swargate Case | पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला पुणे पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गाडे याला शिरूर येथील त्याच्या मूळ गावी अटक करण्यात आली. मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, आरोपीच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला आहे. (Swargate Case)
आरोपीच्या वकिलांचा खळबळजनक खुलासा
स्वारगेट बस स्थानकात पीडित तरुणी आणि दत्ता गाडे यांची ओळख एका महिन्यापूर्वी झाली होती. गाडे याने कोणतीही जबरदस्ती केलेली नसून, पीडित तरुणी स्वतः त्याच्या सोबत गेल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये जाण्याआधी तरुणीने 7,500 रुपये घेतले होते. एवढेच नव्हे, तर त्या ठिकाणी एका एजंटचीही उपस्थिती असल्याची माहिती आरोपीने वकिलांना दिली आहे.
वकिलांचा दावा आहे की, दोघांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला आणि त्यानंतर तरुणीने दत्ता गाडेवर आरोप लावले. त्यामुळे हे प्रकरण जबरदस्तीचे नसून आर्थिक कारणावरून उभे करण्यात आले आहे, असे वकिलांचे म्हणणे आहे.
कॉल रेकॉर्ड्सची तपासणी करण्याची मागणी
आरोपीच्या वकिलांनी हा देखील दावा केला आहे की, पीडित तरुणीवर बलात्कार झालाच नाही. दोघांमध्ये जे काही झाले ते परस्पर संमतीनेच घडले होते. तसेच, दोघेही मागील महिन्याभरापासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यामुळे सत्य समोर येण्यासाठी त्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जावेत, अशी मागणी वकिलांनी केली आहे.
दत्ता गाडे पळून गेला नव्हता, तर तो आपल्या मूळ गावी गेला होता. पोलिसांनी शिरूरमध्ये मोठा फौजफाटा तैनात केल्याने तो तिथे लपून बसल्याचा खुलासा वकिलांनी केला आहे. दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. दत्ता गाडे रात्रीच्या वेळी बस स्थानकावर फिरत असायचा आणि सावज हेरायचा, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. (Swargate Case)
Title : Shocking Claim by Lawyer in Swargate Case






