शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; नव्या दाव्याने खळबळ

Shivsena Mla | लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच पार पडला आहे. अनेकांचं लक्ष हे आता विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही आमदारांनी लोकसभेला ठाकरे गटाला मदत केल्याची माहिती आता समोर आली आहे. अशातच आता विधानसभेला आमचा विचार करावा, अशी साद आता शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांना घातली आहे. यामुळे आता काही आमदार हे आता एकनाथ शिंदे यांची साथ सोडून घरवापसी करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Shivsena Mla)

“आमच्या संपर्कात सध्या सहा ते सात आमदार आहेत”

याबाबत आता ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी यावर भाष्य केलं आहे. आमच्या संपर्कात सध्या सहा ते सात आमदार असल्याची माहिती कुठून आली ही माहिती अद्यापही समोर आली नाही. हा आकडा आता 16 किंवा 40 च्या घरातही जाण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटातील आमदार (Shivsena Mla) आता अस्वस्थ असल्याचं दिसत आहे. आता आपलं सरकार जाणार असल्याती भीती त्यांना असावी. त्यांची भीती आणि अस्वस्थता असण स्वाभाविक आहे, असं त्यांनी म्हटलंय.

“तुम्ही विधानसभेला आमचा विचार करा”

शिंदेंच्या मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. हा प्रयोग आता झालेला नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिंदे गटातील काही आमदारांनी ठाकरे गटातील आमदारांशी संपर्क साधला होता. आम्ही लोकसभेला मतदान करू पण तुम्ही लोकसभेला आमचा विचार करा, असा प्रस्ताव शिंदे गटाच्या आमदारांनी ठेवला असल्याची माहिती आता समोर आली आहे, असं सचिन आहिर यांनी म्हटलं आहे. (Shivsena Mla)

ठाकरे गटात शिंदे गटातील आमदारांना पुन्हा एकदा घेण्यासाठी ठाकरे गटात विचारविनिमय आणि चर्चा सुरू आहे. अनेक आमदार हे शिंदे गटात गेले. मात्र काहींनी टोकाची भूमिका घेतली नाही. टीका केली नाही. तसेच काहींनी आतून ठाकरे गटासाठी लोकसभेला काम केलं होतं. त्यांना परतीचे दरवाजे उघडे ठेवायचे की नाही हा सर्वस्वी ठाकरे गटाचा निर्णय आहे. यावर सध्या चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार ठाकरे गटासोबत संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील काही आमदार हे मुंबईतील आहेत. तर एक आमदार हा पश्चिम महाराष्ट्रातील आणि एक आमदार हा मराठवाड्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आता आगामी विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडेल हे पाहणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा आगामी लोकसभा मतदारसंघावर परिणाम होईल, अशी शक्यता नाकारता येणार नाही.

 News Title – Shivsena Mla Touch With Uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

निकालानंतर महायुतीतील वाद चव्हाट्यावर; शिवसेना नेत्याचा भाजप नेत्याला गंभीर इशारा

…तर तिने आपल्या आईसाठी कायदा हातात घेतला; संजय राऊतांनी कोणाला सहानुभूती दिली?

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांना गावकऱ्यांनी दिला सर्वात मोठा धक्का

भाजपने असं काय केलं? थेट मनसेने घेतली माघार

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी