ठाकरे की शिंदे?, यंदा शिवाजी पार्कवर कोण गाजवणार दसरा मेळावा?

On: September 20, 2024 10:25 AM
shivsena Dussehra melava 2024
---Advertisement---

Dussehra melava 2024 | दसरा सण आता काही दिवसांवर आला आहे. यंदाही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी दसरा मेळावा रंगताना दिसणार आहे. मागच्या वर्षी या पार्कवर मेळावा घेण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटात बराच गदारोळ झाला होता. यंदा मात्र ठाकरे गटाने पहिलं पाऊल टाकलं आहे. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाने पहिला अर्ज दाखल केला आहे. ( Dussehra melava 2024)

मात्र, मुंबई महापालिकेकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. येत्या 12 ऑक्टोबर रोजी दसरा असून आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षी दसरा मेळावा कोण गाजवणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

ठाकरे गटाने 3 महिन्यांपूर्वीच केला अर्ज

छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवसेनेच्या दोन गटांपैकी कोणाला सभा घेण्यास परवानगी मिळणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदा फक्त ठाकरे गटाकडूनच छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी पालिका प्रशासनाकडे अर्ज सादर करण्यात आलाय. ठाकरे गटाने तीन महिन्यांपूर्वीच याबद्दलचा अर्ज दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. ( Dussehra melava 2024)

ठाकरे गटाचे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांनी दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवाजी पार्क मिळावा, यासाठी परवानगी अर्ज दिलाय. पण, या अर्जावर पालिका प्रशासनाने कोणताही निर्णय अद्याप दिला नाही. महेश सावंत यांनी या प्रकरणी पालिकेला तीन वेळा स्मरणपत्रही पाठवले आहे.

यंदाचा दसरा मेळावा कोण गाजवणार?

दरम्यान, शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा हा 1966 साली झाला होता. मात्र, शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर मैदानाच्या परवानगीवरून दोन्ही गटात जोरदार तू तू मै मै पाहायला मिळाली होती. 2022 मध्ये  दोन्ही गटात या मैदानावरून वाद झाला होता. यानंतर ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन लढाईनंतर ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली होती. 2023 मध्ये देखील असाच वाद झाला होता. यामुळे गेल्यावर्षी शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर झाला होता. आता यंदा शिवाजी पार्कवर कुणाचा मेळावा होणार, याकडे सर्वांच्या नजरा असतील. ( Dussehra melava 2024)

News Title : shivsena Dussehra melava 2024

महत्वाच्या बातम्या –

सोनं स्वस्त झालं की महाग?, सराफा बाजारात काय आहेत सध्या दर?

वृषभसह आज ‘या’ 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, धनलाभाचे संकेत

विधानसभेपूर्वीच पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?, कधी आणि किती रुपयांची होणार घसरण?

प्रेम, पद, पैशांचा मार्ग होणार मोकळा; ‘या’ राशींचे येणार अच्छे दिन

“अजित पवार गटाच्या पेजनं अश्लिल पेजला फॅालो केलं”, शरद पवार गटाच्या दाव्याने खळबळ

Join WhatsApp Group

Join Now