Gold-Silver Rate Today | गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीमध्ये घसरण दिसून आली आहे. मागच्या आठवड्यात सोन्याने चांगलीच उसळी घेतली होती. सोने 900 तर चांदी 8,600 रुपयांनी वधारले होते. या आठवड्यात मात्र, घसरण दिसून आली. आज 20 सप्टेंबररोजी आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात देखील सोने खाली आले आहे. (Gold-Silver Rate Today)
17 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी उतरले. तर 18 सप्टेंबररोजी त्यात 160 रुपयांची घसरण झाली. सोने एकूण 270 रुपयांनी स्वस्त झाले. तर, काल 19 सप्टेंबर रोजी सोने एकूण 250 रुपयांनी स्वस्त झाले. आज सकाळी देखील घसरणीचे संकेत मिळाले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गेल्या आठवड्यात चांदीत 7 हजारांपेक्षा अधिकची वाढ झाली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी 16 सप्टेंबर रोजी चांदीत पुन्हा हजार रुपयांची वाढ झाली. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी प्रत्येकी एक हजारांनी चांदी उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,900 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73,485, 23 कॅरेट 73,191 तर 22 कॅरेट सोने 67,312 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 55,114 रुपये, 14 कॅरेट सोने 42,989 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. (Gold-Silver Rate Today)
तसेच एक किलो चांदीचा भाव 90,900 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क लागू केला जात नाही. मात्र, सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव-
ग्राहक घरी बसल्या देखील सोने आणि चांदीच्या किंमती जाणून घेऊ शकतात. स्थानिक कर तसेच इतर करांमुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येऊ शकते. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात. मात्र, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार या दिवशी किंमती जाहीर होत नाहीत. (Gold-Silver Rate Today)
News Title : Gold-Silver Rate Today 20 September 2024
महत्वाच्या बातम्या –
वृषभसह आज ‘या’ 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, धनलाभाचे संकेत
विधानसभेपूर्वीच पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?, कधी आणि किती रुपयांची होणार घसरण?
प्रेम, पद, पैशांचा मार्ग होणार मोकळा; ‘या’ राशींचे येणार अच्छे दिन
“अजित पवार गटाच्या पेजनं अश्लिल पेजला फॅालो केलं”, शरद पवार गटाच्या दाव्याने खळबळ
“लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या”; सलमान खानच्या वडिलांना का दिली धमकी






