शिरूरमध्ये अजितदादांना धक्का; अमोल कोल्हे यांनी आढळरावांना टाकलं मागे

On: June 4, 2024 9:04 AM
Shirur Election Results Amol Kolhe in the lead
---Advertisement---

Shirur Election Results | शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांनी आपला उमेदवार उतरवला आहे. येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी शरद पवार गटातील अमोल कोल्हे यांची थेट लढत आहे. शिरूरमध्ये अजित पवारांनी आपल्या बऱ्याच सभा गाजवल्या.त्यामुळे ही जागा अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर

आज 4 जूनरोजी लोकसभेचा निकाल लागत आहे. आता हाती आलेल्या कलानुसार येथे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे तब्बल 6 हजार 116 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे आढळराव पाटील यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

निवडणूक प्रचारमध्ये अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांनी एकमेकांवर अनेक आरोप केले होते. कोल्हे यांनी तर पुरावे देखील सादर केले होते. त्यामुळे या लढतीत इथे कोण बाजी मारणार, याकडे (Shirur Election Results )राज्याचं लक्ष लागलं आहे.

अमोल कोल्हे vs शिवाजी आढळराव पाटील

अजित पवारांनी प्रत्येक सभेत कोल्हे यांना टार्गेट केलं होतं. त्याबदल्यात कोल्हे यांनी देखील जशास तसं उत्तर दिलं. राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर या दोन्ही गटाकडून एकेमकांवर सतत आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. अशात शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचा उमेदवार आघाडीवर म्हटल्यावर हा अजित (Shirur Election Results ) पवारांसाठी धक्का मानला जात आहे.

News Title – Shirur Election Results Amol Kolhe in the lead

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला धक्का बसण्याची शक्यता; प्रणिती शिंदे आघाडीवर

हिमाचलमध्ये कंगना रनौतला धक्का; कॉँग्रेसचे विक्रमादित्य सिंह आघाडीवर

बारामतीत कांटे की टक्कर; पहिल्या फेरीत सुप्रिया सुळे आघाडीवर

भाजपने गुलाल उधळला; या उमेदवाराने फडकावला विजयाचा पताका

मोठी बातमी! निकाल लागण्यापूर्वीच पेट्रोल-डिझेलचे दर घसरले?

Join WhatsApp Group

Join Now