राज्यातला पहिला जल्लोष, निकालाआधीच अमोल कोल्हेंकडून अशाप्रकारे आनंद साजरा

On: June 4, 2024 1:17 PM
amol kolhe
---Advertisement---

Shirur Election Results | शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे आघाडीवर कायम आहेत. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपला उमेदवार उतरवला आहे. येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी अमोल कोल्हे यांची थेट लढत आहे. शिरूरमध्ये अजित पवारांनी आपल्या बऱ्याच सभा गाजवल्या.त्यामुळे ही जागा अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

अमोल कोल्हेंची 60 हजार मतांनी आघाडी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे हे बाराव्या फेरीअखेर 60 हजार मतांनी आघाडीवर आहेत.अमोल कोल्हे यांचा प्रवास हा विजयाकडे सुरू असून त्यांनी निकालाआधीच पेढे भरवून जल्लोष साजरा केलाय.

अमोल कोल्हे यांनी गाईंना पेढे भरवल्याचं यावेळी दिसून आलं. त्यामुळे त्यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे. आघाडी घेतल्यानंतर कोल्हे यांच्या घरासमोर आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे.

अमोल कोल्हे vs शिवाजी आढळराव पाटील

कार्यकर्त्यांनी अमोल कोल्हेंना पेढे भरवण्यासाठी एकच गर्दी केल्याचं दिसून आलं. आता पुढील काहीच तासात निकालाचं संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. शिरुरमध्ये आढळराव पाटील यांना जिंकून आणण्यासाठी अजित पवारांनी मोठे प्रयत्न केले. यावेळी प्रचारादरम्यान त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर सतत टीका केली होती. तरी देखील अमोल कोल्हे यांनी शिरूर मध्ये मोठी लीड घेतली आहे. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

News Title – Shirur Election Results Amol Kolhe in lead

महत्त्वाच्या बातम्या-

ओमराजे निंबाळकरांचं डोंगराएवढं लीड… अर्चना पाटील यांचा पराभव अटळ?

जालन्यात रावसाहेब दानवेंचं टेंशन वाढलं! कॉँग्रेस उमेदवाराची जोरदार आघाडी

मोदींची लाट ओसरली?; महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने भाजपचं टेन्शन वाढवलं

शरद पवारांचा जलवा; 10 पैकी 10 जागांवर जोरदार मुसंडी

पुण्यात मतमोजणी सुरु असताना घडला धक्कादायक प्रकार!

Join WhatsApp Group

Join Now