Shirdi Saibaba Coin Dispute | साईबाबांनी अखेरच्या क्षणी त्यांच्या निस्सीम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली चांदीची 9 नाणी – ज्यांचा भक्तीतून इतिहासाशी थेट संबंध आहे, तीच नाणी आज शिर्डीत मोठ्या वादाचा केंद्रबिंदू बनली आहेत. याच वादात साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी केलेलं DNA तपासणीसंबंधीचं वक्तव्य चांगलंच वादग्रस्त ठरलं. (Shirdi Saibaba Coin Dispute)
वादग्रस्त वक्तव्य आणि संतप्त ग्रामस्थ :
अरुण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, “ज्यांच्याकडे खरी नाणी असल्याचा दावा आहे, त्यांनी साईबाबांचा DNA पुरावा द्यावा.” या वक्तव्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. साईबाबांसारख्या पूज्य संताच्या बाबतीत अशा शब्दांचा वापर केल्याने संतप्त साईभक्तांनी रस्त्यावर उतरत गायकवाड यांचा निषेध केला आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
वाद वाढल्यानंतर गायकवाड यांनी स्पष्टीकरण देत माफी मागितली. त्यांनी सांगितलं की, “मला साईबाबांचा नाही, तर नाण्यांचा DNA म्हणायचं होतं. बोलता बोलता चुकून ते शब्द उच्चारले गेले.” त्यांनी याप्रकरणात कोणतीही श्रद्धा दुखावण्याचा हेतू नव्हता, असंही स्पष्ट केलं.
Shirdi Saibaba Coin Dispute | नाण्यांचा वाद नेमका काय? :
1918 साली विजयादशमीच्या दिवशी, साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना चांदीची 9 नाणी भेट दिली होती. आज लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशज — चंद्रकांत शिंदे आणि संजय शिंदे यांचा दावा आहे की ती नाणी त्यांच्या कडे आहेत. (Shirdi Saibaba Coin Dispute)
दरम्यान, 2022 मध्ये संजय आणि चंद्रकांत शिंदे यांनी संस्थानकडे तक्रार केली होती की गायकवाड हे नाणी भाविकांना दाखवून देणग्या घेत आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने चौकशी करून अहवालात नमूद केलं की नाणी ट्रस्टकडे आहेत. मात्र, तक्रारदारांचा आरोप आहे की, “आम्हाला सुनावणीसाठी समन्सच दिले गेले नाहीत.”






