शिल्पा शेट्टीच्या खुलाशाने बॉलिवूड हादरलं, म्हणाली अक्षयने माझा वापर…

On: January 27, 2025 5:32 PM
shilpa shetty
---Advertisement---

Shilpa Shetty | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत शिल्पाने चाहत्यांचे मनोरंजन केले. आज शिल्पा बॉलिवूडपासून दूर असली तरी, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.

सांगायचे झाले तर, शिल्पाचे व्यावसायिक आयुष्य नाही तर, खासगी आयुष्य अधिक चर्चेत राहिले. शिल्पा आता पती राज कुंद्रा आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा शिल्पाचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले जात होते.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूडमध्ये काम करत असताना शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. पण, अक्षयसोबत ब्रेकअपनंतर शिल्पा पूर्णपणे कोलमडून गेली होती. यावर शिल्पाने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता.

अभिनेत्री म्हणाली होती, “अक्षयने माझा फक्त वापर केला. दुसरी व्यक्ती आयुष्यात आल्यानंतर त्याने मला सोडले… अक्षय माझ्यासाठी कायम खास राहिला, पण असे काही होईल याचा मी कधी विचार देखील केला नव्हता…” अक्षयसोबत ब्रेकअपनंतर शिल्पाने अनेक अडचणींचा सामना केला.

अनुभव सिन्हा यांच्यासोबतचे नाते-

अक्षयसोबत ब्रेकअपनंतर शिल्पाच्या (Shilpa Shetty) आयुष्यात दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांची एन्ट्री झाली. ‘दस’ सिनेमाचे शूटिंग सुरू असताना अनुभव आणि शिल्पा यांचे नाते घट्ट झाले. पण तेव्हा अनुभव विवाहित असून बाप देखील होते. एक काळ असा देखील होता जेव्हा शिल्पा आणि अनुभव यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. पण मुलाखतीत या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही, अनुभव आणि माझ्यात चांगली मैत्री आहे, असे शिल्पा म्हणाली होती.

‘बिग ब्रदर’ शो आणि आयुष्यातील नवीन वळण

मात्र, शिल्पाच्या आयुष्यात एक असे वळण आले जेव्हा अभिनेत्री यशाच्या शिखरावर (Peak of Success) पोहोचली. 2007 मध्ये शिल्पाने ‘बिग ब्रदर’ (Big Brother) शोमध्ये भाग घेतला आणि शो जिंकला (Won). शो जिंकल्यानंतर शिल्पाने कधीच मागे वळून पाहिले नाही.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा-

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा याची दुसरी पत्नी आहे. राज कुंद्रा याच्या पहिल्या पत्नीचे नाव कविता असे आहे. राज कुंद्रा आणि कविता यांना एक मुलगी देखील आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शिल्पा कायम मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

News Title : Shilpa Shetty’s reveals about personal life

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now