Shilpa Shetty । बॉलिवूड इंडस्ट्री नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. दरम्यानच अजून एका विषयावरून बॉलिवूड चर्चेत आले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. राज कुंद्रा हा मोठा उद्योगपती आहे आणि तब्बल ६० कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप त्याच्यावर आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण :
बऱ्याच कालावधीपासून त्याच्यावर याचा खटला सुरु असून आता जोपर्यंत ही रक्कम जमा करत नाहीत तोपर्यंत शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा यांना भारत सोडून बाहेर जाता येणार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यासंदर्भात शिल्पा शेट्टीला देखील दिलासा मिळाला नाही.
विदेशात जाण्याच्या परवानगीसाठी शिल्पा शेट्टीने कोर्टात अर्ज केला होता. एका कार्यक्रमात जाण्यासाठी तिला विदेशात जायचे आहे असे कारण तिने दिले होते. हा अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. कोर्टाने सांगितले की फक्त फोन कॉलचा उल्लेख आमच्यासाठी पुरेशी नाही. जर फक्त कॉल्सचा संदर्भ असेल तर फोन नंबर आम्हाला द्या, आम्ही पडताळणी करू.
Shilpa Shetty | याचिका केली रद्द :
कोर्टाच्या या विधानानंतर फोन नंबर देण्याऐवजी शिल्पा शेट्टीने उतरण घेऊन परदेशात जाण्याचा निर्णयच रद्द केला. मागील दोन सुनावणीत परवानगी मिळाली नाही म्हणून दौरा रद्द केला आहे असे शिल्पाच्या वकिलाने कोर्टात माहिती दिली आहे. दौरा रद्द केला आहे असे सांगून मुंबई उच्च न्यायालयातील याचिका देखील रद्द केली आहे.
लोटस कॅपिटल फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दीपक कोठारी (Dipak Kothari) यांनी या दोघांविरोधात कोर्टात गुन्हा दाखल केला होता. तब्बल ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा मोठा गुन्हा या दोघांवर दाखल झाला आहे आणि आता त्यांना ६० कोटी रुपये भरल्यानंतरच भरता बाहेर जाता येईल.






