शिखर धवन पुन्हा चढणार बोहल्यावर; पाहा कोण आहे होणारी बायको?

On: January 6, 2026 11:36 AM
Shikhar Dhawan
---Advertisement---

Shikhar Dhawan | पूर्व भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज आणि ‘गब्बर’ म्हणून ओळखला जाणारा शिखर धवन पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यातील नवा अध्याय सुरू करण्यास सज्ज झाला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर खासगी आयुष्यामुळे चर्चेत असलेला शिखर धवन आता दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. शिखर धवन आणि त्याची गर्लफ्रेंड सोफी शाइन यांच्या लग्नाची तारीख ठरल्याची माहिती समोर येताच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. (Shikhar Dhawan second marriage)

शिखर धवन हे लग्न आयर्लंडची रहिवासी असलेल्या सोफी शाइन हिच्याशी करणार आहे. या विवाहसोहळ्याचे आयोजन फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिल्ली-एनसीआर परिसरात होणार असल्याची माहिती आहे. हा विवाहसोहळा खासगी पण भव्य स्वरूपात पार पडणार असून, क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित राहण्याची चर्चा आहे.

सोफी शाइन कोण आहे? :

सोफी शाइन (Sophie Shine) ही मूळची आयर्लंडची असून, गेल्या काही काळापासून ती शिखर धवनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 2025 मध्ये दुबई येथे झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका सामन्यादरम्यान शिखर आणि सोफी एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबाबत चर्चा रंगू लागल्या. दोघेही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसू लागल्यानंतर त्यांच्या नात्याला अधिकृत स्वरूप मिळाल्याचे मानले जात होते.

सोफी शाइन फारशी प्रसिद्धीच्या झोतात नसली तरी शिखर धवनसोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरही दोघांचे फोटो आणि उपस्थिती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. आता हे नाते विवाहबंधनात अडकणार असल्याने शिखर धवनच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी मानली जात आहे.

Shikhar Dhawan | पहिल्या लग्नानंतर दुसरी संधी :

विशेष म्हणजे हे शिखर धवनचे दुसरे लग्न असणार आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आयशा मुखर्जीशी विवाह केला होता. मात्र काही वर्षांनंतर दोघांमध्ये मतभेद झाल्याने घटस्फोट झाला. या पहिल्या विवाहातून शिखर धवनला जोरावर धवन नावाचा 11 वर्षांचा मुलगा आहे. घटस्फोटानंतर शिखर धवन वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा भावनिक पोस्टमुळे चर्चेत आला होता. (Shikhar Dhawan second marriage

आता सोफी शाइनसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याने शिखर धवन पुन्हा एकदा आनंदी आणि स्थिर आयुष्याकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. क्रिकेट मैदानावर आक्रमक शैलीसाठी ओळखला जाणारा ‘गब्बर’ आता वैयक्तिक आयुष्यातही नवा डाव खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

News Title: Shikhar Dhawan to Marry Sophie Shine: Former India Opener Set for Second Wedding

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now