Sheeba Akashdeep | बॉलिवूड अभिनेत्री शीबा आकाशदीप (Sheeba Akashdeep) हिने अलीकडेच 1995 च्या ‘सुरक्षा’ (Surakshaa) चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या एका शॉकिंग घटनेचा खुलासा केला. या घटनेत तिचा आणि अभिनेता आदित्य पांचोली (Aditya Pancholi) याचा रात्रीच्या वेळी मोठा वाद झाला होता.
काय घडलं होतं त्या रात्री?
शीबा (Sheeba Akashdeep) सांगते, “मी खूप थकले होते. दोन शिफ्ट पूर्ण करून सेटवर आले होते. तेव्हा व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या, त्यामुळे मी गाडीतच झोपले होते. शूटिंगसाठी बाहेर आले, दिग्दर्शक सीन समजावत होता, तेव्हा आदित्य पांचोली काहीतरी बोलला. मी खूप झोपेत होते, म्हणून सहज बोलून गेले – ‘तुमचं काम तुम्हीच करा.’”
View this post on Instagram
या वाक्याने आदित्य पांचोली संतापला आणि त्याने मोठ्या आवाजात शिवीगाळ आणि ओरडण्यास सुरुवात केली. “रात्रीच्या वेळी रस्त्यावर जोरात भांडण सुरू झालं,” असं शीबाने सांगितलं.
शीबा सेटवरून का निघून गेली?
या वादानंतर शीबाला भीती वाटू लागली आणि ती रडू लागली. मात्र, तिथे उपस्थित निर्मात्याने यात काहीही हस्तक्षेप केला नाही. यामुळे शीबा खूप निराश झाली आणि तिने सेटवरून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
“मी कारमध्ये बसले, दार जोरात बंद केलं आणि सेट सोडला. मी निर्मात्याला सांगितलं – ‘मी आता इथे काम करू शकत नाही. त्याने माझा अपमान केला आणि तुम्ही काहीही केलं नाही. मी पुन्हा सेटवर परत येणार नाही.’
‘सुरक्षा’ चित्रपट पूर्ण कसा झाला?
शीबाने हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी परतण्यास नकार दिला. तरीही 1995 मध्ये राजू मवानी (Raju Mavani) दिग्दर्शित हा चित्रपट रिलीज करण्यात आला. यात आदित्य पांचोली, सुनील शेट्टी (Suniel Shetty), सैफ अली खान (Saif Ali Khan), दिव्या दत्ता (Divya Dutta), शीबा आणि मोनिका बेदी (Monica Bedi) हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
या चित्रपटात दोन लहान गुन्हेगार सुरज आणि राजा एका श्रीमंत वारसदार किरणकडून हिरे अंगठी चोरण्याच्या कटात अडकतात. बॉलिवूडमधील वादग्रस्त किस्स्यांमध्ये ही घटना अजूनही चर्चेत आहे.
News Title : Sheeba Akashdeep Reveals Fight with Aditya Pancholi






