Sharad Ponkshe | मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) नेहमी त्यांच्या वक्तव्याला घेऊन चर्चेत असतात. त्यांनी आतापर्यंत अनेकदा हिंदू धर्माबाबत वक्तव्य केलं आहे. याआधी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत देखील वक्तव्य केलं आहे. अशातच आता त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यापोस्टमध्ये कुठेही निवडणुकीचा उल्लेख केला नाही, मात्र त्यांचा अप्रत्यक्षरित्या त्यांनी काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वक्तव्याचा दाखला देत फेसबुकवर हिंदूच हिंदुत्वाच्या विरोधात ठाकतात असं सावरकरांनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून देणारी एक पोस्ट केली आहे. त्याचा संदर्भ हा कालच्या निवडणुकीच्या निकालाशी लावला जात आहे.
काय म्हणाले शरद पोंक्षे?
शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा आहे. ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं वाक्य पुन्हा एकदा खरं ठरलं आहे. मला मुस्लिमांची ख्रिश्चनांची भिती वाटत नाही. मला हिंदूंची भिती वाटते. कारण हिंदूचं हिंदूंच्या विरोधात उभे ठाकतात, शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांची फेसबुक पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
अशातच आता शरद पोंक्षे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टची जोरदार चर्चा होताना दिसते. शरद पोंक्षे यांच्या फेसबुक पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकाने लिहिलं की, मुस्लिम मतांचा एकगठ्ठा मतदान हेच भाजप 400 पार पासून पराभूत होण्यासाठी कारणीभूत..यांना हिंदू राष्ट्रासाठी मोदीजी नक्कीच नको, एकाने लिहिलं हिंदू अजूनही झोपलेलाच आहे, सत्याचा विजय झाला आणि हरामखोरी गळ्यात आली, हिंदुत्ववादी नेत्यांचे ठेकेदार मुस्लिम…मग कसे हिंदुत्व शिकवणार सामान्य लोकांना..पब्लिक है सर सब जानती है, जात आणि धर्म जिंकला, विकास हारला..उठा हिंदुनो आता तरी जागे व्हा, अशा अनेक कमेंट सोशल मीडियावरील पोस्टवर व्हायरल होताना दिसत आहेत.
राज्याचा विचार केला तर यंदा राज्यामध्ये महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसुंडी मारली आहे. तर महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या असल्याचं समजतंय. राज्यात काँग्रेसने सर्वाधित 13 जागांवर विजय मिळवला आहे.
संपूर्ण देशाचा विचार केल्यास इंडिया आघाडीने 232 जागांपर्यंत मजल मारली. तसेच एनडीएने देशात 294 जागांवर आघाडी मिळवली आहे. 400 पार हा नारा अपयशी ठरला आहे. एनडीए जरी आघाडीवर असली तरीही फार कमी फरकाने एनडीएने लीड मिळवलं आहे.
News Title – Sharad Ponkshe Facebook Post Viral
महत्त्वाच्या बातम्या
दारुण पराभवानंतर राजू शेट्टी यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टनं खळबळ
संविधान वाचवण्यासाठी ‘या’ नेत्यांनी एकत्रित यावे; बड्या नेत्याचं विधान
महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल वाचा एकाच ठिकाणी
महाराष्ट्रात सर्वाधिक स्ट्राईक रेटसह सर्वात मोठा पक्ष कोणता?






