“बरं झालं शिवरायांच्या काळात…”, शरद पोंक्षे यांच्या वक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता

Sharad Ponkshe | अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे त्यांच्या वक्तव्यावरून अनेकदा चर्चेत असतात. त्यांनी याआधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अनेकदा वक्तव्य  केलं होतं. त्यांनी आता गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य केलं आहे. ते या वक्तव्याने चर्चेत आले आहेत. बरं झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गांधी नव्हते. नाहीतर महाराज अहिंसक झाले असते. ते अफझल खानाला भेटायला जात असताना निशस्त्र गेले असते, असं वक्तव्य शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी केलं आहे. यावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे.

अहिंसा परमो धर्म म्हणणाऱ्या महात्मा गांधी जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाला नव्हता. हे आपलं नशीबच म्हणावं लागेल. नाहीतर आता आपले महाराज गांधींचा आदर ठेवत अहिंसक झाले असते आणि अफजल खानाला भेटायला निशस्त्र गेले असते. त्यामध्ये महाराज संपले असते असं वक्तव्य आता शरद पोंक्षे यांनी केलं आहे. या वक्तव्याची चर्चा आहे. त्यानंतर त्यांनी बोलत असताना संभाजी ब्रिगेडवर हल्ला केला.

शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) म्हणाले की, अफजल खानचा वध करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला अनेक पत्र लिहिली आहेत. त्यात नमती भूमिका घेऊन त्यांनी अफजल खानाला फसवलं आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलं गेलं. श्रीकृष्णाच्या नीतीने त्याचा वध केला. बंर झालं त्याकाळी संभाजी ब्रिगेडसारख्या दरिद्री संस्था नव्हत्या. नाही तर त्यांनी महाराजांवर टीकेची झोड उठवत अफजल खान महाराष्ट्रात एवढी नसून नासधूस करताना, मंदीर नष्ट करताना महाराज प्रतापगडावर बसून राहिले आहेत, अशी टीका केली असती.

नेमकं काय म्हणाले शरद पोंक्षे?

छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या किल्ल्यावरून खाली येतील यासाठी अफजल खानाने अनेक प्रकारचे प्रयत्न केले. तुळजापूरमध्ये नासधुस केली. मूर्त्या फोडल्या. पिकांची नासधूस केली. मंदीरात गो हत्या केली. पुजाऱ्यांना गोमांस खायला लावले, मात्र तरीही छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या खाली उतरले नाही, असं ते म्हणाले.

संभाजी ब्रिगेडवर हल्लाबोल

बरं झालं ब्रिगेडी लोकं आणि अशा दरिद्री संस्था त्या काळात नव्हत्या. नाही तर हे पाहून शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या असत्या. अफजल खानने महाराजांना एकटं आणि निशस्त्र बोलवलं होतं. मात्र छ्त्रपती शिवाजी महाराज एकटे गेले नाही आणि निशस्त्र ही गेले नाही. ते शस्त्र घेऊन गेले. अहिंसा परमो धर्म असे म्हणणाऱ्या महात्मा गांधींचा त्या काळात जन्म झाला नाही हे आपलं नशीब आहे, असं शरद पोंक्षेंनी म्हटलं.

महाराज नियोजन करून गेले. जिजाऊंचा आशीर्वाद घेतला, ब्राह्मणाला नमस्कार केला त्यानंतर महाराज गडाखाली उतरले. याला म्हणतात युद्धनीती मग अफजलखानचा कोथळा बाहेर काढून त्याला संपवले, राजा कसा असावा तर असा, असं शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) म्हणाले.

News Title – Sharad Ponkshe controversial Statement About Gandhi And Chhatrapati Shivaji Maharaj

महत्त्वाच्या बातम्या

पुढील 48 तासांत ‘या’ भागांना अवकाळी झोडपणार; हायअलर्ट जारी

‘मोदींनी गेले तीन महिने आराम केला नाही, त्यामुळेच…’; चंद्राबाबूंचं मोठं वक्तव्य

नितीश कुमारांनी धरले नरेंद्र मोदींचे पाय, पाहा व्हिडीओ

चंद्राबाबू यांच्या पत्नीची संपत्ती 579 कोटींनी वाढली; पाच दिवसांत नेमकं असं काय घडलं?

मुंबई भाजपात मोठा राजकीय भूकंप होणार?, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ