शरद पवारांना लागली बारामतीमधील विजयाची चाहुल; केलं मोठं वक्तव्य

On: May 23, 2024 12:04 PM
Baramati Loksabha
---Advertisement---

Baramati Loksabha l सध्या देशभरात लोकसभा निवडणूक नुकत्याच पार पडल्या आहे. या निवडणुकीचं सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील प्रतिष्ठापणाला लावली आहे. यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात बारामती मतदार संघ हा केंद्रस्थानी होता. कारण बारामतीमध्ये पवार विद्रुढ पवार अशी लढत पाहायला मिळाली आहे.

बारामतीत विजयाची खात्री असायला काहीही हरकत नाही :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या काटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. मात्र या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा येत्या 4 जूनला लागणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांचं लक्ष हे 4 जूनच्या निकालालकडे लागलं आहे. मात्र अशातच आता राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येत्या 4 जूनच्या निकालावर एक मोठं भाष्य केलं आहे.

शरद पवार यांना बारामतीत विजयाची खात्री आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “बारामतीत विजयाची खात्री असायला काहीही हरकत नाही. यापूर्वी बारामतीत निवडणुकीमध्ये कधीही पैशाचा वापर झाला नाही, पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पैशाचा वापर झाला आहे असं सांगण्यात येत आहे. मात्र आता त्याचा परिणाम निकालावर किती होईल हे आज तरी सांगता येणार नाही.

Baramati Loksabha l राज्यातील जनता एनडीएला जनता धडा शिकवेल :

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी केला आहे. कारण राज्यातील जनता एनडीएला जनता धडा शिकवेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. एनडीएमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचा समावेश आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी साथ सोडून भाजपसोबत हातमिळवणी केली आहे.

त्यामुळे या लोकसभा निडणुकीत अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी देखील लढत पाहायला मिळाली आहे. पुढील भवितव्यासाठी काका-पुतण्याची प्रतिष्ठेची लढाई असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा ही बारामती लोकसभा मतदार संघाचीच होती.

News Title – Sharad Pawar Statement On Baramati Lok Sabha Election Result

महत्त्वाच्या बातम्या

बापरे! साड्यांच्या किंमती वाढल्या; मोजावे लागणार ‘इतके’ जास्त पैसे

आरसीबीने दिनेश कार्तिकला दिला खास निरोप; भावुक व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला! ‘या’ आमदाराचे निधन

पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठं वळण; कोर्टाने दिला मोठा निर्णय

या राशीच्या व्यक्तींनी वादाचे प्रसंग टाळावेत अन्यथा होईल मोठं नुकसान

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now