शरद पवारांच्या प्रकृती संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती समोर!

On: February 10, 2026 11:19 AM
Sharad Pawar Health Update
---Advertisement---

Sharad Pawar Health Update | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष (Sharad Pawar) यांना अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे पुण्यातील (Pune) रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांना नेमका काय त्रास झाला, सध्या त्यांची तब्येत कशी आहे आणि रुग्णालयातून सुट्टी कधी मिळणार, याबाबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टरांकडूनही त्यांच्या आरोग्याविषयी सविस्तर अपडेट देण्यात आली आहे.

डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत माहिती :

रुबी हॉल क्लिनिकमधील फिजीशियन डॉ. अभिजीत लोढा (Dr. Abhijit Lodha) यांनी सांगितले की शरद पवारांना छातीत संसर्ग (Chest Congestion) झाला आहे. त्यामुळे त्यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवत होता. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या असून, सध्या सर्व अहवाल समाधानकारक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. (Sharad Pawar Health Update)

डॉक्टरांच्या माहितीनुसार, शरद पवारांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आलेले नाही. ते रुग्णालयातील खासगी खोलीत उपचार घेत असून, वैद्यकीय पथकाच्या सतत देखरेखीखाली आहेत. त्यांचे ऑक्सिजन लेव्हल आणि इतर आवश्यक पॅरामीटर्स सामान्य मर्यादेत असल्याचेही सांगण्यात आले आहे. ते डॉक्टरांशी तसेच भेटायला येणाऱ्यांशी संवाद साधत असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे नमूद केले आहे.

Sharad Pawar Health Update | सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आणि पुढील उपचार :

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर पोस्ट करत आपल्या वडिलांच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की शरद पवारांना छातीत संसर्ग झाल्यामुळे पाच दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स (Antibiotics Course) पूर्ण करावा लागणार आहे. सुदैवाने इतर सर्व वैद्यकीय चाचण्या सामान्य आल्या असून काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही, असेही त्यांनी नमूद केले. (Sharad Pawar Health Update)

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत शरद पवारांचे सतत दौरे, बैठका आणि कार्यक्रम सुरू होते. वयोमानामुळे आलेली दगदग आणि हवामानातील बदल यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. बारामती (Baramati) येथील निवासस्थानी असताना अस्वस्थता वाढल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांच्या मते, सुरू असलेल्या औषधोपचारांचा परिणाम आणि अंतिम अहवाल पाहूनच त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला जाईल.

News Title: Sharad Pawar Health Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now