“सुजल्यावरच कळतंय..”; शरद पवार गटाने बॅनरद्वारे अजित पवारांना डिवचलं

Sharad Pawar Faction | लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 8 जागांवर विजय मिळवलाय. बारामतीमध्ये तर, सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला.

या पार्श्वभूमीवरच आता कोल्हापुरात बॅनरबाजीतून अजित पवार यांना डिवचलं आहे.कोल्हापूरमधील दाभोळकर चौक परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बॅनरद्वारे अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय.

शरद पवार गटाकडून बॅनरबाजी

हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलय कुठं..’ ही अवघी एक ओळ या बॅनरवर आहे. मात्र, यातून अजित पवार यांना टार्गेट करण्यात आलंय, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

बॅनरवर शरद पवार यांचा फोटो आणि त्यांच्या पक्षाचे चिन्ह (Sharad Pawar Faction) असलेली तुतारी हा फोटोही असून या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. रात्री हे बॅनर लागल्यानंतर याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न

दुसरीकडे उद्धव ठाकरे राहत असलेल्या मातोश्री परिसरामध्ये देखील सत्ताधाऱ्यांनी बॅनरबाजी केली आहे. ‘राज तिलक की करो तयारी, एक अकेला सबसे भारी…. फिर एक बार मोदी सरकार’, अशा आशयाचा बॅनर मातोश्री बाहेर झळकला.

या बॅनरवर नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे (Sharad Pawar Faction) यांचा फोटो आहे. उद्धव ठाकरे हे देशाच्या पंतप्रधान पदाचे दावेदार ठरू शकतात असं म्हणणाऱ्यांना डिवचण्याचा शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. निकाल लागल्यानंतर सध्या सगळीकडे अशा बॅनरची चर्चा होते आहे.

News Title – Sharad Pawar Faction target on Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंप?, शिंदे गटाच्या दाव्याने खळबळ

भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z माहिती

नगरमध्ये मोठा राडा; निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरेकडून गर्भवती महिलेवर हल्ला; भाजपचा गंभीर आरोप

मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय!

एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका; ऑनलाईन सेवा बंद राहणार