“…याचा अर्थ असा होत नाही की मी इस्लामचा स्वीकार करेल”, गौरी खानचं मोठं वक्तव्य

On: May 29, 2024 3:07 PM
Shahrukh Khan-Gauri Khan
---Advertisement---

Shahrukh Khan-Gauri Khan | गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरूख आणि त्याचं कुटुंब हे आयपीएलमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. यंदाची आयपीएल 2024 हे वर्ष अनेक कारणाने चर्चेत होतं. यावर्षी शाहरूखच्या कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवला आहे. याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. त्यावेळी शाहरूख आणि पत्नी गौरी खान (Shahrukh Khan-Gauri Khan) यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अशातच आता गौरीने शाहरूखच्या धर्मावर भाष्य केलं आहे. (Shahrukh Khan-Gauri Khan)

शाहरूखला उष्मघात झाला होता तेव्हा गौरीने शाहरूखची  काळजी घेतली होती. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच आता गौरीने शाहरूखच्या धर्मावर भाष्य केलं आहे. तसेच तिने आपला मुलगा आर्यन खानला कोणता धर्म आवडतो त्यावर देखील भाष्य केलं आहे.

काही दिवसांआधी ऋतिक रोशनची पहिली पत्नी सुजान खानसोबत शाहरूखची पत्नी गौरी खानने (Shahrukh Khan-Gauri Khan) कॉफी विथ करण शोमध्ये शाहरूखच्या आणि स्वत:च्या धर्मावर भाष्य केलं होतं.

“…याचा अर्थ असा होत नाही की मी इस्लाम स्विकारला”

मी शाहरूखच्या धर्माचा आदर करते म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की मी इस्लाम स्विकारला आहे. प्रत्येकाने आपापला धर्म मानायला हवा. कोणत्याच धर्माचा अपमान होऊ नये. ज्याप्रमाणे शाहरूख माझ्या धर्माचा अपमान करत नाही…, असं गौरी म्हणाली होती. एवढंच नाही तर शाहरूख खानने देखील धर्मावर मोठं वक्तव्य केलं आहे. (Shahrukh Khan-Gauri Khan)

“आमची मुलं हिंदुस्थान”

आमच्यामध्ये कधी हिंदू मुस्लिम असं कधी झालंच नाही. गौरी ही हिंदू आहे आणि मी मुस्लिम आहे. तसेच आमची मुलं ही हिंदुस्तान आहेत, असं शाहरूख खान एका शोमध्ये म्हणाला होता. त्यानंतर त्याने सांगितलं की, आमच्या घरात गणपती, दिवाळी, ईद असे सर्वच सण साजरे होतात.

शाहरूख आणि लेक सुहाना लवकरच आगामी ‘किंग’ या सिनेमात दिसणार आहेत. द अर्चीस या सिनेमात सुहाना खानने डेब्यू केला आहे. त्यानंतर आता बाप-लेक सुहाना आणि शाहरूख एकाच सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

News Title – Shahrukh Khan-Gauri Khan Both Are Respect Each Other Religion

महत्त्वाच्या बातम्या

तुला पाहिजे तेवढे पैसे घे; कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट

मनोज जरांगे विरोधात ‘त्या’ तरुणाने असं काय केलं?…म्हणून बसला बेदम चोप

मासिक पाळीदरम्यान ‘या’ अभिनेत्रींना होतो प्रचंड त्रास; केली मोठी मागणी

कॅशबॅकपासून बिल भरण्यापर्यंत, या 4 बँकांनी बदलले क्रेडिट कार्डचे नियम; काय परिणाम होणार?

कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद

Join WhatsApp Group

Join Now