शाहरुख खान ‘या’ गोष्टीत कधीही यशस्वी होणार नाही; गौतम गंभीर असं का म्हणाला?

On: May 31, 2024 1:53 PM
Gautam Gambhir
---Advertisement---

Gautam Gambhir l आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स या संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. यंदाच्या वर्षीच्या आयपीएल सामन्यात अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत. अर्थातच आयपीएल सामना अत्यंत रोमांचक पद्धतीने पार पडला आहे. चेन्नईच्या स्टेडिअमवर सनरायझर्स हैदराबाद विरोधात कोलकाता नाइट रायडर्सने हा विजय नोंदवला आहे.

गौतम गंभीर शाहरुख विषयी मोकळेपणे व्यक्त झाला :

कोलकाता नाइट रायडर्स या संघाचा सहमालक हा शाहरुख खान आहे. 2008 पासून केकेआर हा संघ शाहरुखकडे आहे. तसेच अभिनेत्री जुही चावला आणि तिचा पती जय मेहता हे देखील या संघाचे सहमालक आहेत. यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा मार्गदर्शक हा माजी क्रिकेटर गौतम गंभीर हा आहे.

अशातच गौतम गंभीरने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत गंभीर शाहरुखविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. शाहरुख खान हा संघाचा मालक असला तरी तो मालकसारखा नाही तर अगदी खेळाडूसारखा वागतो असं गौतम गंभीर म्हणाला आहे.

Gautam Gambhir l शाहरुख या गोष्टीत कधीही यशस्वी होणार नाही :

आयपीएलचा 2024 चा हा सिझन कोलकाता नाइट रायडर्सने जिंकल्यानंतर तू कोणत्या गाण्यावर नाचलास असा प्रश्न गौतमला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर गंभीरने अत्यंत हास्यस्पद उत्तर दिल आहे. त्यावेळी तो म्हणाला की, “शाहरुख भाई त्याच्या आयुष्यात खूप प्रचंड यशस्वी ठरला आहे. भविष्यातही तो भरपूर यश संपादित करत राहील.

पण मात्र अशी एक गोष्ट आहे, ज्यामध्ये शाहरुखला कधीही यश मिळालं नाही. ते म्हणजे मला स्वतःला नाचवणं. मला नाचवण्यात त्याला शाहरुखला अद्याप तरी यश मिळालेलं नाही आणि भविष्यातही तो कधीही यशस्वी ठरणार नाही. कारण मी कधीही गाऊ आणि नाचू शकतच नाही.”

News Title – Shah Rukh Khan Has Been Unsuccessful In Only One Thing In Life Gautam Gambhir Reveals About KKR Owner

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ दिवशी रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; टीम इंडियाचे शिलेदार कोण असणार?

गुड न्यूज! सोनं तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी घसरलं; जाणून घ्या आजचे दर

घराबाहेर पडण्यापुर्वी विचार करा! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

निकालाआधीच पिंपरी चिंचवडमध्ये झळकले उदयनराजेंच्या विजयाचे बॅनर!

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर अजितदादांच्या ‘या’ आमदाराचा प्रभाव; प्रांताधिकाऱ्याने केला गंभीर आरोप

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now