Shadashtak Yog 2025 | ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचाली माणसाच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकतात. एकदा का ग्रहयोग अनुकूल झाला, की रखडलेली कामं मार्गी लागतात, अडचणी दूर होतात आणि यशाचे दरवाजे उघडू लागतात. असाच एक महत्त्वाचा योग 15 डिसेंबर 2025 पासून तयार होत असून, सूर्य आणि गुरू यांच्या षडाष्टक योगामुळे तीन राशींचं नशीब पूर्णपणे बदलू शकतं, असा दावा ज्योतिषतज्ज्ञ करत आहेत.
धनु संक्रांतीपूर्वी तयार होणारा हा योग काही राशींसाठी मोठा आर्थिक लाभ, मान-सन्मान आणि प्रगतीची संधी घेऊन येणार आहे. त्यामुळे 15 डिसेंबरनंतर या तीन राशींसाठी कुबेराचा खजिनाच उघडणार असल्याचं मानलं जात आहे. (Shadashtak Yog 2025)
सूर्य, गुरूचा षडाष्टक योग नेमका काय असतो? :
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीतील सहावे आणि आठवे घर एकमेकांशी संबंधात आले की षडाष्टक योग तयार होतो. सामान्यतः हा योग कर्ज, आजार, संघर्ष, शत्रू आणि अडचणी दर्शवतो, त्यामुळे तो अशुभ मानला जातो. मात्र, जेव्हा या योगामध्ये सूर्य आणि गुरूसारखे बलवान व शुभ ग्रह सहभागी होतात, तेव्हा त्याचे परिणाम उलट सकारात्मक ठरू शकतात.
ज्योतिषींच्या मते, बलवान ग्रहांमुळे निर्माण होणाऱ्या संघर्षातून व्यक्ती अधिक मजबूत, परिपक्व आणि यशस्वी होते. पंचांगानुसार, 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी सूर्य आणि गुरू यांचा हा शक्तिशाली षडाष्टक योग तयार होणार असून, तीन राशींसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरू शकतो.
Shadashtak Yog 2025 | या 3 राशींचं नशीब उजळणार :
मिथुन (Gemini) :
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येणार आहे. दीर्घकाळापासून अडकलेली कामं मार्गी लागतील. नोकरी किंवा व्यवसायात मान-सन्मान वाढेल आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील, तर आरोग्याशी संबंधित किरकोळ अडचणी कमी होतील. प्रवास आणि नवीन ओळखी भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
कर्क (Cancer) :
कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य-गुरूचा षडाष्टक योग मोठा दिलासा देणारा ठरेल. जुने संघर्ष, तणाव आणि अडचणी मागे पडतील. नोकरीत पदोन्नती किंवा व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. आर्थिक व्यवहारांमध्ये योग्य निर्णय घेतल्यास चांगला फायदा होईल. मानसिक शांतता मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. घर, मालमत्ता किंवा कुटुंबाशी संबंधित शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. (Shadashtak Yog 2025)
सिंह (Leo) :
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळण्याची चिन्हं आहेत. जुने वाद, कोर्टकचेरी किंवा अडचणी कमी होतील. आरोग्य सुधारेल आणि आत्मविश्वास दुप्पट होईल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम असून, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल घडतील.






