DMart Offers | नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागताच पालकांची शालेय साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर डीमार्ट (DMart) ने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मोठ्या सवलतींचा पाऊस पाडला आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच विविध वस्तूंवर आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. बॅगपासून ते वह्या आणि स्टीलच्या बाटल्यांपर्यंत अनेक वस्तूंवर कमी दरात विक्री सुरू आहे.
शालेय वस्तूंवर मोठ्या सवलती :
डीमार्ट (DMart) मध्ये ग्राहकांना नेहमीच कमी दरात वस्तू उपलब्ध होतात. अनेक उत्पादनांवर ‘एक खरेदी करा, एक मोफत मिळवा’ अशा योजना देखील राबवल्या जातात. त्यामुळेच अनेक कुटुंबांचा खरेदीसाठी डीमार्टकडे कल वाढलेला दिसतो. घरगुती वस्तूंसह मुलांच्या शालेय साहित्याची मोठी रेंज एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने ग्राहकांना सोय होते. यावर्षी काही शाळा सुरू झाल्या असून अनेक ठिकाणी 14 जूनपासून नवीन सत्राला सुरुवात होणार आहे.
याच काळात विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंवर डीमार्टने विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. आकर्षक डिझाइन आणि मजबूत गुणवत्तेच्या स्कूल बॅग फक्त 299 रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालकांना कमी खर्चात मुलांसाठी चांगल्या दर्जाच्या वस्तू घेण्याची संधी मिळत आहे. मुलांनाही विविध रंगांच्या आणि स्टायलिश बॅग्सची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
DMart Offers | टिफीन, बाटल्या आणि वह्यांवरही ऑफर :
शाळा सुरू होताना विद्यार्थ्यांना नवीन टिफीन बॉक्स आणि पाण्याच्या बाटल्यांची गरज असते. हे लक्षात घेऊन डीमार्ट (DMart) ने टिफीन बॉक्सवरही मोठी सूट दिली आहे. मुलांसाठी वापरता येतील असे टिफीन बॉक्स केवळ 99 रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच प्लास्टिकऐवजी स्टीलच्या बाटल्यांचा वापर वाढत असल्याने स्टीलच्या वॉटर बॉटल्सवरही सवलत जाहीर करण्यात आली आहे. ग्राहकांना या बाटल्या फक्त 139 रुपयांत मिळत आहेत.
याशिवाय वह्यांच्या खरेदीवर तब्बल 15 टक्के सूट देण्यात येत आहे. कम्पास बॉक्स आणि पेन्सिल खरेदीवरही 20 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळत असल्याने पालकांचा खर्च कमी होत आहे. या ऑफर मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध असल्याने अनेकांनी डीमार्टमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे. शाळेसाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंवर सूट मिळत असल्यामुळे ग्राहकांकडून या ऑफरला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.






