SBI च्या करोडो ग्राहकांसाठी फायद्याची बातमी! भविष्यात व्हालं लखपती

On: December 10, 2025 7:05 PM
SBI Har Ghar Lakhpati Scheme
---Advertisement---

SBI Har Ghar Lakhpati Scheme | देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वाची आणि फायदेशीर बचत योजना जाहीर केली आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी नागरिक पोस्ट ऑफिस, LIC, FD आणि RD योजनांचा वापर करताना दिसतात. मात्र आता SBI ने देखील नियमित बचत करणाऱ्यांसाठी आकर्षक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ‘हर घर लखपती’(SBI Har Ghar Lakhpati Scheme) या नावाने सुरू केलेल्या या योजनेत कमी रकमेपासून दीर्घकालीन निधी उभारण्याची उत्तम संधी मिळते.

शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये वाढलेली गुंतवणूक पाहता अनेक गुंतवणूकदारांना सुरक्षित व जोखमीविरहित पर्यायांची गरज भासते. त्यांना लक्षात घेऊन एसबीआयने ही खास रिकरिंग डिपॉझिट योजना तयार केली आहे. ज्येष्ठ नागरिक, सामान्य ग्राहक तसेच अल्पवयीन मुलांच्या नावानेही ही योजना सुरू करता येते, त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्थिक सुरक्षा निर्माण करणारा हा पर्याय आहे.

दरमहा थोडी गुंतवणूक, भविष्यात मोठी बचत :

एसबीआयची ‘हर घर लखपती योजना’ ही पूर्णपणे कस्टमाइज्ड RD योजना आहे. दर महिन्याला किती रक्कम जमा करायची हे ग्राहक स्वतः ठरवू शकतात. 591 रुपयांच्या मासिक हप्त्यापासूनही (Monthly Deposit 591) गुंतवणूक सुरू करता येते. निश्चित कालावधी पूर्ण झाल्यानंतर या हप्त्यांच्या गुंतवणुकीवर सुमारे 1 लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊ शकतो.

या योजनेचा कालावधी 3 ते 10 वर्षांपर्यंत उपलब्ध आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीत व्याज अधिक जमा होत जात असल्याने गुंतवणूकदारांना अधिक लाभ मिळतो. विशेष म्हणजे पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लहान वयापासून गुंतवणूक सुरू करू शकतात, ज्यामुळे शिक्षण, करिअर किंवा इतर गरजांसाठी सुरक्षित आर्थिक आधार तयार करता येतो.

SBI Har Ghar Lakhpati Scheme | कडक अटींमुळे वाढती विश्वासार्हता :

योजनेअंतर्गत एसबीआय ग्राहकांना 6.50% ते 6.75% या आकर्षक दराने वार्षिक व्याज दिले जाते. सरकारी बँकेचा विश्वास, नियमित व्याजदर आणि जोखमीविरहित बचत यामुळे ही योजना विशेष पसंत केली जात आहे. खासकरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी तसेच स्थिर उत्पन्न असणाऱ्यांसाठी ही योजना भविष्यातील आर्थिक अडचणी टाळण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

तथापि, या योजनेत एक महत्त्वाची अट आहे. सलग सहा हप्ते न भरणाऱ्या खातेदारांचे खाते आपोआप बंद होते. त्यामुळे नियमित बचतीची शिस्त पाळणाऱ्या लोकांसाठी हे गुंतवणुकीचे उत्तम शस्त्र ठरू शकते. पगारातून किंवा व्यवसायातून थोडी रक्कम बाजूला काढून दर महिन्याला गुंतवणूक केली तर काही वर्षांत मोठा निधी तयार होऊ शकतो.

आजच्या काळात गुंतवणुकीसाठी सुरक्षित (Safe Investment) ठिकाण शोधणे हे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरते. जोखीम न घेता पैसे वाढवायचे असतील तर SBI ची ‘हर घर लखपती योजना’ हा उत्तम, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन पर्याय आहे. घरातील प्रत्येक सदस्यासाठी खाते उघडून कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी हा मजबूत पाऊल ठरू शकतो.

News Title: SBI Har Ghar Lakhpati Scheme: Invest Just ₹591 Per Month to Get ₹1 Lakh Returns

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now