Casting Couch | कास्टिंग काउचविषयी तर आपण बऱ्याचवेळा ऐकत असतो. आतापर्यंत अनेक महिला कलाकारांनी त्यांना आलेल्या कास्टिंग काउचच्या अनुभवा विषयी सांगितलं. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या अतिप्रसंगांच्या घटना सांगितल्या आहेत. अशात आणखी एका अभिनेत्रीने मोठा खुलासा केलाय.
अभिनेत्री सयानी गुप्ताने (Sayani Gupta) ‘रेडिओ नशा’ला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितलं आहे की शूटिंगदरम्यान तिच्या एका सहकलाकाराने दिग्दर्शकाने कट सांगितल्यानंतरही तो किस करत राहिला होता. अनेक वेळा सहकलाकार इंटिमेट सीन दरम्यान फायदा घेण्याचा प्रयत्न करतात.
“कट म्हटला तरी तो करतच राहिला”
तिने सांगितले की ती एक इंटिमेट सीन शूट करत होती, त्यामुळे दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही अभिनेत्याने किस घेणे थांबवलं नाही. अनेक लोक इंटिमेट सीन्सचा फायदा घेतात. माझ्यासोबतही अशा घटना घडल्या आहेत, असं तिने सांगितलं.
Casting Couch | “माझ्याजवळ 70 माणसं होती”
मला समुद्र किनाऱ्यावरील वाळूवर लहान ड्रेसमध्ये झोपावं लागलं आणि माझ्यासमोर क्रूसह जवळजवळ 70 लोक होते. तेव्हा मला खूप असुरक्षित वाटत होतं, कारण माझ्याजवळ 70 माणसं होती. पण स्टाफ पैकी कोणीही नव्हतं, असंही सयानी म्हणाली.
दरम्यान, सयानी गुप्ताच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास तिने ‘आर्टिकल 15’, ‘जॉली एलएलबी 2’, ‘जग्गा जासूस’, ‘फॅन’, ‘कॉल मी बे’, ‘फोर मोअर शॉट्स प्लिज’, ‘पगलेट’, ‘बार बार देखो’ यांसारख्या सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘माझा पक्ष, माझे वडिल….’; पार्थ पवारांचा अमोल मिटकरींना थेट इशारा
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला का?
“लोकप्रियता मिळवण्यासाठी मी…”; पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
‘मी मोदी आणि शाह यांना फोनवर सांगितलं…’; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे शिंदेंना मान्य, जाता जाता म्हणाले…






