पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणाला नवं वळण, धक्कादायक माहिती समोर!

On: March 13, 2025 11:40 AM
Satish Wagh Murder Wife Mohini and Lover Akshay Conspired
---Advertisement---

Satish Wagh Murder | पुण्यातील भाजप (BJP) आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी लष्कर न्यायालयात (Lashkar Court) एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्येचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर असून, त्याला वाघ यांची पत्नी मोहिनी हिने साथ दिली. त्यांनी सतीश यांचा खून करण्यासाठी जादूटोणा (Black Magic) केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. (Satish Wagh Murder)

हत्येचा घटनाक्रम

9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी सतीश वाघ यांचे अपहरण करून 72 वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला. सतीश यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल झाला, जो नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर 2013 पासून एकमेकांच्या संपर्कात होते. अक्षय त्यांच्याकडे भाड्याने राहत होता. मोहिनीच्या मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या निमित्ताने ते अधिक जवळ आले. 2017 मध्ये सतीश यांना संशय आल्याने अक्षयने घर सोडले, पण त्यांचे अनैतिक संबंध (Immoral Relationship) सुरूच राहिले.

पतीच्या त्रासाला कंटाळून मोहिनीने अक्षयला सतीशचा काटा काढण्यास सांगितले. वर्षभरापासून ते दोघे खुनाचा कट रचत होते. घरात भेटणे शक्य नसल्याने ते लॉजवर भेटत. मोहिनीने एका मांत्रिक महिलेचीही मदत घेतली. अक्षयने खुनाची सुपारी पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना दिली. त्यांनी तीन वेळा रेकी केली. सुरुवातीला दुचाकीवरून येऊन मारण्याचा कट फसला. नंतर अपहरण करून चारचाकी गाडीत वार करून खून केला आणि मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला.

सुपारीचे पैसे

सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी पाच लाख रुपयांना देण्यात आली होती. मोहिनीने एकही रुपया दिला नाही. अक्षयने दीड लाख रुपये आगाऊ दिले आणि खुनानंतर त्याच दिवशी उर्वरित तीन लाख रुपये दिले. (Satish Wagh Murder)

Title : Satish Wagh Murder Wife Mohini and Lover Akshay Conspired

 

Join WhatsApp Group

Join Now