सतीश भोसले उर्फ खोक्याची तुरुंगातून सुटका; कोर्टात नेमकं काय घडलं वाचा सविस्तर

On: April 3, 2026 12:37 PM
Satish Bhosale
---Advertisement---

Satish Bhosale News | बीड जिल्ह्यातील चर्चेत असलेले सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले यांची तब्बल वर्षभरानंतर कारागृहातून सुटका झाली आहे. कोर्टाने निर्दोष मुक्तता दिल्यानंतर भोसले थेट आपल्या शिरूर कासार येथील राहत्या घरी पोहोचले. मात्र घरी पोहोचल्यानंतर उद्ध्वस्त झालेला घरसंसार पाहून तो भावूक झाल्याचे दिसून आले.

भोसले यांनी सांगितले की, गेल्या एका वर्षात त्यांचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले. “माझ्या आयुष्याची कमाई संपली, माझं कुटुंब रस्त्यावर आलं. घरातील लेकराबाळांना आणि आई-वडिलांना राहायला छतही उरलं नाही,” असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले.

‘सत्याचा विजय झाला’ – सतीश भोसले :

कोर्टाने निर्दोष मुक्तता दिल्यानंतर भोसले यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. “माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले होते, मात्र कोर्टात सत्य समोर आलं. न्यायदेवतेवर माझा विश्वास होता आणि आज मला न्याय मिळाला,” असे त्यांनी सांगितले. (Satish Bhosale Khokya Beed)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत बोलताना त्यांनी तो खोटा असल्याचा दावा केला. “मला मुद्दाम टार्गेट करून माझ्या कुटुंबावर अन्याय करण्यात आला,” असेही भोसले यांनी म्हटले.

Satish Bhosale News | नेमकं प्रकरण काय? :

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार परिसरात एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी भोसले यांना अटक केली होती. या प्रकरणासोबतच पिता-पुत्राला मारहाण आणि वन्यप्राण्यांच्या शिकारीसंदर्भातही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान भोसले यांचे नाव स्थानिक राजकारणातही चर्चेत होते. ते भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. कारागृहात असताना त्यांच्या शिरूर कासारमधील वनविभागाच्या जागेवरील ग्लास हाऊसवर कारवाई करून ते जमीनदोस्त करण्यात आले होते. (Satish Bhosale News)

एक वर्ष कारागृहात राहिल्यानंतर ढाकणे पिता-पुत्र मारहाण प्रकरणात कोर्टाने भोसले यांची निर्दोष मुक्तता केली, तर बॅटने मारहाण प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला. कारागृहातून बाहेर पडताच भोसले यांची आणखी एक सोशल मीडिया रील देखील चर्चेत आली आहे.

News Title: Satish Bhosale ‘Khokya’ Released After One Year: Gets Emotional Seeing Destroyed Home in Beed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now