Satara Loksabha l लोकसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत अनेक मोठ्या उलाढाली झाल्या आहेत. अशातच सर्वत्र कन्हाड मतदार संघांची चर्चा रंगली आहे. या मतदार संघात घरच्याच आमदाराने शशिकांत शिंदेंचा घात केल्याची माहिती समोर आली आहे.
शशिकांत शिंदेंचा झाला घात :
ज्येष्ठ आणि दिग्गज नेते यशवंतराव चव्हाण यांचा कन्हाड उत्तर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून खासदार शरद पवार यांच्या पाठीशी राहिला आहे. सध्या आमदार बाळासाहेब पाटील हे या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. अशातच यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम केल्याने महाविकासचे उमेदवार शशिकांत शिंदें प्रचंड मताने निवडणून येतील अशी आशा सर्वाना होती.
मात्र या निवडणुकीत भाजप यशस्वी ठरला आहे. शिंदेंना केवळ 1724 चे मतं मिळाले आहेत. त्यामुळे घरच्या आमदाराने शिंदेंचा घात केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कन्हाड झालेली सभा यशस्वी झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कन्हाड उत्तरचे लोकसभा प्रभारी मनोज घोरपडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी फिल्डवर उतरत पळून केलेल्या कामामुळेच राष्ट्रवादीचे मताधिक्य घटविण्यात भाजपला यश आले आहे.
Satara Loksabha l भाजपचे फासे योग्य पडले :
लोकसभा निवडणुकीच्या निकालातून भाजप पक्षाने ठाण मांडण्यासाठी टाकलेले फासे योग्य दिशेने पडत असल्याचे यामधून दिसून आले आहे. अशातच आत्ता या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून आजपर्यंत पक्षाचे वर्चस्व कायम आहे. येथून ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी देखील प्रतिनिधित्व केले आहे. अशातच ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील आणि सध्या आमदार बाळासाहेब पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत.
आमदार पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र असताना दबदबा कायम ठेवला होता. या मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून धैर्यशील कदम, तर अपक्ष म्हणून मनोज घोरपडे यांनी विरोधात निवडणूक लढवली होती.
News Title : Satara Loksabha Shashikant Shinde
महत्त्वाच्या बातम्या-
दारुण पराभवानंतर राजू शेट्टी यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टनं खळबळ
संविधान वाचवण्यासाठी ‘या’ नेत्यांनी एकत्रित यावे; बड्या नेत्याचं विधान
महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल वाचा एकाच ठिकाणी
महाराष्ट्रात सर्वाधिक स्ट्राईक रेटसह सर्वात मोठा पक्ष कोणता?






