“पप्पा मला म्हणालेले…”; संतोष देशमुखांच्या मुलीचा सर्वात मोठा खुलासा

On: March 10, 2025 6:05 PM
Santosh Deshmukh Murder Vaibhavi Deshmukh Reveals Shocking Details
---Advertisement---

Santosh Deshmukh Murder | महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) हत्या प्रकरणातील तपासात नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून आरोपींनी देशमुख यांच्यावर कसा अमानुष अत्याचार केला याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हत्येपूर्वी संतोष देशमुख यांनी आपल्या मुलीशी काय बोलले होते, याचा खुलासा वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) हिने आपल्या जबाबात केला आहे.

वैभवी देशमुखकडून मोठा खुलासा 

आरोपपत्रानुसार, हत्या होण्याच्या काही काळ आधी संतोष देशमुख यांनी आपल्या मुलीशी संवाद साधला होता. वैभवीच्या जबाबानुसार, देशमुख म्हणाले होते, “माझे काही बरं-वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे.” या घटनेपूर्वीच विष्णू चाटे (Vishnu Chate) आणि संतोष देशमुख यांच्यात फोनवर संवाद झाला होता.

देशमुख यांनी चाटेला समजावताना सांगितले होते, “भाऊ, एवढं काय झालं नाही? कशाला इतकं ताणता? लहान गोष्टीवरून जीवावर उठता?” हा संवाद जवळपास 10-12 मिनिटे सुरू होता, असेही वैभवीने सांगितले.

6 डिसेंबरला हल्ला, 9 डिसेंबरला अपहरण आणि हत्या

6 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग गावातील ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) व त्याच्या साथीदारांना मारहाण करून गावातून हाकलून दिले. यानंतर विष्णू चाटेने देशमुखांना फोन केला, आणि त्यानंतर देशमुख तणावात होते, असे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे.

9 डिसेंबर रोजी देशमुखांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना अमानुषपणे मारहाण करून संपवण्यात आले. आरोपींनी त्यांना अत्यंत हालहाल करून  मारल्याचे पुरावे आता समोर आले आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.

कृष्णा आंधळे अद्याप फरार 

दरम्यान, या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अद्याप फरार आहे. विरोधकांनी त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. आंधळे यानेच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर राज्यात प्रचंड गदारोळ झाला. तसेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला आहे.

Title : Santosh Deshmukh Murder Vaibhavi Deshmukh Reveals Shocking Details

 

Join WhatsApp Group

Join Now