संतोष देशमुख हत्या प्रकरणाला मिळणार वेगळं वळण?, आज बीडमध्ये विशेष सुनावणी

On: March 26, 2025 8:30 AM
Santosh Deshmukh
---Advertisement---

Santosh Deshmukh Case | बीड (Beed) जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज विशेष महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) प्रथमच बीड न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. या खटल्यातील आरोपपत्र, डिजिटल पुरावे आणि आरोपींच्या जबाबासंदर्भात महत्त्वाचे निर्णय आज अपेक्षित आहेत. (Santosh Deshmukh Case)

उज्ज्वल निकम पहिल्यांदाच बीड न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित

आजच्या सुनावणीस सकाळी 11.30 ते 12 दरम्यान सुरुवात होणार असून, यामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सहभागी होणार आहेत. या सुनावणीपूर्वी सकाळी 10 वाजता धनंजय देशमुख यांनी उज्वल निकम यांची भेट घेण्याचे निश्चित केले आहे. या प्रकरणाच्या सुरक्षेच्या कारणास्तव याआधी केज न्यायालयात चाललेल्या सुनावणीला यावेळी बीडमध्ये हलवण्यात आले आहे. मागील सुनावणीत आरोपी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर होते, मात्र आज प्रत्यक्ष हजेरी लागणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे.

वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींना आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर केले जाईल की प्रत्यक्ष कोर्टात आणले जाईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमुळे ही सुनावणी अधिक लक्षवेधी ठरणार आहे. बीड जिल्हा न्यायालयात निकम पहिल्यांदाच उभे राहत असल्यामुळे, स्थानिक स्तरावरही याकडे विशेष लक्ष लागले आहे.

आरोपींच्या जबाबांवर आणि पुराव्यांवर आज होणार चर्चा

या प्रकरणात आरोपींच्या वकिलांनी आरोपपत्रातील सर्व माहिती मिळालेली नसल्याचा दावा मागील सुनावणीत केला होता. त्यांनी आरोपींचे जबाब बंद लिफाफ्यात असल्याने त्यांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी कोर्टात केली होती. शिवाय, व्हिडीओ क्लिप, सीडीआर, कॉल रेकॉर्ड, ऑडिओ फाइल्स यांसारखे डिजिटल पुरावे मिळावेत, अशीही मागणी केली होती.

सरकारी वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी 26 मार्चपर्यंतची मुदत मागितली होती. न्यायालयानेही आरोपींच्या वकिलांचा अर्ज सरकारी वकिलांकडे सुपूर्त करत त्यानुसार कागदपत्रे पुरवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीत हे कागदपत्र दिल्यानंतर आरोपींच्या वकिलांची बाजू काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Title : Santosh Deshmukh Case Ujjwal Nikam Joins todays Hearing

 

Join WhatsApp Group

Join Now