“चंद्राबाबू आणि नितीशकुमार आज तिकडे तर उद्या आमच्याकडे..”; ‘या’ खासदाराचा खळबळजनक दावा

NDA Govt | लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. एनडीए आघाडी आता सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली करत आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एनडीए नेत्यांची बैठक देखील झाली आहे.

या बैठकीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. अशात इंडिया आघाडीच्या एका बड्या नेत्याने खळबळजनक दावा केला आहे.

“एनडीए सरकार चालवताना मोदींच्या नाकीनऊ..”

इंडिया आघाडीच्या एका बड्या नेत्याने मोदींच्या सरकारबाबतची मोठी भविष्यवाणी केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. एनडीए सरकार चालवताना मोदींच्या नाकीनऊ येतील, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

“एनडीने सत्तास्थापनेचा दावा केला असला तरीही सरकार चालवताना मोदींच्या नाकी नऊ येतील. एनडीए आहे कुठे? चंद्राबाबू आणि नितीश कुमार म्हणजे एनडीए का? हे दोघं तर सगळ्यांचेच आहेत. आज ते तुमच्याकडे आहेत, उद्या आमच्याकडे येतील.”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे (NDA Govt) खळबळ उडाली आहे.

“कॉँग्रेसमुक्त करणाऱ्या भाजपला आम्ही बहुमतमुक्त केलंय”

पुढे ते म्हणाले की, “अग्निवीर योजनेला सरकार स्थापनेच्या आधीच विरोध झालाय. इतर योजनांनाही विरोध दर्शवतील. उद्या राम मंदिरालाही ते विरोध करु शकतात.चंद्राबाबू मुस्लिम आरक्षणाच्या बाजूने आहेत. आता मोदी काय करतील? अनेक मुद्दे आहेत ज्यावर चर्चा सुरु आहे. त्यांना सरकार बनवायचं आहे बनवू द्या. पण मोदींकडे आणि भाजपाकडे बहुमत नाही.”, असं राऊत म्हणाले आहेत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणायचे की, मी काँग्रेसमुक्त भारत करणार. पण, झालं याच्या उलट आहे. आता आम्ही सगळ्यांनी मिळून भाजपाला बहुमतमुक्त केलंय. तरीही त्यांना सरकार (NDA Govt) बनवायचं आहे, तसा दावा ते करत आहेत ही लोकशाहीची थट्टा आहे.”, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

News Title –  Sanjay Raut big claim on NDA Govt

महत्त्वाच्या बातम्या-

निकालानंतर महायुतीतील वाद चव्हाट्यावर; शिवसेना नेत्याचा भाजप नेत्याला गंभीर इशारा

…तर तिने आपल्या आईसाठी कायदा हातात घेतला; संजय राऊतांनी कोणाला सहानुभूती दिली?

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांना गावकऱ्यांनी दिला सर्वात मोठा धक्का

भाजपने असं काय केलं? थेट मनसेने घेतली माघार

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी